Monday, July 1, 2024

राखी सावंतला पती रितेशचा पाठिंबा, राघव चड्ढांच्या ‘या’ विधानावर घेतली त्यांची शाळा

आपल्या डान्सने आणि बिनधास्त स्वभावाने चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री राखी सावंत वेगवगेळ्या वक्तव्यांवरून चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर ती राजकीय कोनातून चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. आपचे आमदार राघव चड्ढा यांनी नवज्योतसिंग सिद्धूला पंजाबच्या राजकारणाची राखी सावंत म्हटल्यापासून अभिनेत्री चर्चेत आली. नवज्योतसिंग सिद्धूची तुलना तिच्याशी केल्याने चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे. अनेकांनी यावर निषेध व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पत्रकारांनी राखीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने तिचा पती रितेशला पत्रकारांसोबत संवाद साधायला सांगितले. यावेळी रितेश म्हणाला की, “राखीने या प्रकरणी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.” तसेच राघव चड्ढा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत तो म्हणाला की, “एक स्त्री आपल्या आयुष्यात आई, बहीण आणि जीवनसाथीची मुख्य भूमिका पार पाडत असते. तीच आपल्याला जीवन देते. मिस्टर चड्ढा आणि ‘आप’चे महिलांविषयी वाईट मत आहे. परंतु जर त्यांना स्त्रीच्या सन्मानाला धक्का पोहचवून निवडणूक जिंकायची असेल, तर ते कोणीच मान्य करणार नाही. योग्य उमेदवार निवडणे मतदाराच्या हातात आहे. तसेच अशा उमेदवारांना जनतेने मत नाही दिले पाहिजे”

रितेश पुढे म्हणतो की, “त्यांना माहित नाही का राखी सावंत कोण आहे? राखी ती कामे करते जी या देशातील राजकारण्यांनी केली पाहिजेत. ती एकमेव अशी व्यक्ती आहे जिने रस्त्यावरील गरीब मुलांना नारळ पाणी पाजले आहे. राखी नेहमीच स्वतःबद्दल सर्वकाही खरे बोलते. त्यामुळेच तिला अनेकवेळा मूर्ख आणि ड्रामेबाज बोलले जाते. पण तिचे काही चुकले, तर ती माफी देखील लगेच मागते.”

तसेच नवजोत सिंग सिद्धू हे खूप चांगले व्यक्ती आहेत, असे म्हणत तो पुढे बोलतो की, “राघव चड्ढा नवजोत सिंग सिद्धूशी कधीच बरोबर नाही करू शकत. राघव चड्ढा कोणत्याच गुणांनी नेता बनण्याच्या लायकीचे नाहीत. या देशामध्ये ५० टक्के महिला मतदार आहेत.”

राखीने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. राजकारणात तिच्या नावाचा अशा पद्धतीने वापर केल्याने तिचे चाहते देखील यावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा