टीव्ही स्टार राखी सावंतच्या आयुष्यात गेल्या काही दिवसांपासून काहीनाकाही अडचणी सुरु आहे. महिनाभरापूर्वी राखी सावंतने तिच्या लग्नाची माहिती साेशल मीडियाद्वारे दिली होती. 21 दिवसांपूर्वी आदिल दुर्राणीने स्वतः त्याच्या आणि राखीच्या लग्नाला होकार दिला होता, पण आता राखीने जाहीर केले आहे की आदिल तिला सोडून दुसऱ्या मुलीकडे गेला आहे. राखी सावंत सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी)ला पुन्हा एकदा मीडियासमोर आली आणि म्हणाली, ‘अखेर आदिल मला सोडून कायमचा त्या दुसऱ्या मुलीकडे गेला आहे.’
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (rakhi sawant) सातत्याने मीडियासमोर येऊन तिच्या वैवाहिक जीवनातील अडचणीबद्दल बोलत आहे. अशात सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी)ला राखी मीडियासमोर आली आणि तिने तिच्या आणि आदिलमधील नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केले.
View this post on Instagram
राखीने स्वतः एक रील अपलोड केली आहे, ज्यामध्ये ती मीडियाशी बोलताना दिसत आहे. राखी म्हणाली, “मी अनेक संधी दिल्या पण शेवटी आदिल मला सोडून त्या मुलीकडे गेला. जाे बायकाेचा हाेऊ शकला नाही ताे तुझा काय हाेणार? मला पाहायचं आहे. चॅलेंज. तो एका वर्षापासून माझ्यासोबत हाेता. माझ्याकडे तुझे ऑडिओ – व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये तू मला शिवीगाळ केली आहे. कारण, तुला आदिलचा पाठिंबा होता. मात्र,आता मी मीडियासमोर आली आहे.”
View this post on Instagram
दुसर्या व्हिडिओमध्ये राखी म्हणताना दिसत आहे, ‘माझा बाॅलिवूडमध्ये येण्यासाठी वापर केला गेला. माझे सर्व पैसे घेतले. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. माझा भावनिक, शारीरिक, मानसिक वापर केला गेला आहे. लग्नानंतर मला कळले की त्याच्यावर म्हैसूरमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत…’
View this post on Instagram
एक वर्षापूर्वी राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांचे नाते जगा समोर आले होते. आदिलच्या आधी राखी सावंतने रितेशसोबत लग्नाचा दावा केला होता. मात्र, राखीने वर्षानुवर्षे रितेशचा चेहरा कोणाच्याही समोर येऊ दिला नाही आणि रितेशही पहिल्यांदाच बिग बॉसमध्ये दिसला. नंतर रितेशचे आधीच लग्न झाल्याची बाब समोर आली.आता रितेशनंतर पुन्हा एकदा आदिलनेही राखीला मध्येच सोडून दिले आहे.( dramaqueen rakhi sawant marriage shattered she claims her husband adli durrani used me physically and mentally )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज
अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’