Monday, July 1, 2024

राखी सावंतच्या आईचे निधन, झाले होते दोन जीवघेणे आजार

राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. त्या दीर्घकाळापासून ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाने त्रस्त होत्या. राखीची आई जया सावंत या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. राखीचा पती आदिल दुर्रानी यांनी जया यांच्या मृत्यूची माहिती दिली.

राखीच्या आईची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब होती. राखीला अनेकवेळा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. यासाेबतच राखी अनेकदा मीडियासमोर तिच्या आईच्या तब्येतीचे अपडेट्स देताना दिसली. तसेच ती चाहत्यांना सतत आईसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करत असे. जया यांच्या निधनामुळे राखी आणि तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

राखी सावंत नुकतीच बिग बॉस मराठीमध्ये दिसली होती. शोमधून बाहेर आल्यानंतर तिला तिच्या आईच्या तब्येतीची माहिती मिळाली, ज्यानंतर तिने लगेच हॉस्पिटल गाठले. राखीने सोशल मीडियावर आईच्या आजाराबाबत चाहत्यांना सांगितले. यावेळी राखी खूप भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

विशेष म्हणजे अभिनय आणि नृत्याव्यतिरिक्त राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच तिने आदिल दुर्रानीसोबत लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. राखीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, जे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. याशिवाय शर्लिन चोप्राच्या वतीने एफआयआर नोंदवल्यानंतर राखीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, नंतर तिला पोलिसांनी सोडून दिले. राखीवर मॉडेलचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. (dramaqueen rakhi sawant mother jaya bheda passes away suffering from brain tumour and cancer )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शाहरुखच्या पठाणला छेद पाडत ‘वेड’ चित्रपटानं केली ‘इतक्या’ कोटींची कमाई, पोस्ट शेअर करत रितेश म्हणाला…

‘लोकांना शाहरुखचा…’, पठाण वादावर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

हे देखील वाचा