Thursday, July 18, 2024

‘जवान’चा आयुष्मान खुरानाला दणका; ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाच्या कमाईत 14व्या दिवशी मोठी घट

गेल्या महिन्यात एक वर एक धडाकेबाज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला सनी देओलचा ‘गदर 2‘ चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगलीचं कमाई केली. हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2‘ 25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला. अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड 2‘ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ मधील खडतर स्पर्धा असूनही आहे. या स्पर्धेत आता ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट मागे पडत आहे.

हे चित्रपट तिकीट खिडकीवर ठाम राहिला आहे आणि चांगली कमाई करत आहे. मात्र, शाहरुख खानच्या ‘जवान’चा परिणाम ‘ड्रीम गर्ल 2’च्या (Dream Girl 2)  कमाईवर झाला असून, यासोबतच आयुष्मानच्या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये रिलीज झालेला ‘ड्रीम गर्ल’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला होता. राज शांडिल्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिक्वेल नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.69 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर ‘ड्रीम गर्ल 2’ ने पहिल्या आठवड्यात 67 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. आता ‘ड्रीम गर्ल 2’ च्या रिलीजच्या 14व्या दिवसाच्या कमाईत मोठी घट झाली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ‘ड्रीम गर्ल 2’ ने रिलीजच्या 14 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी फक्त 1 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच ‘ड्रीम गर्ल 2’ ची 14 दिवसांची एकूण कमाई आता 95.69 कोटींवर गेली आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ ला रिलीजच्या पहिल्या दिवसापासून ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’शी स्पर्धा करावी लागली आहे. आता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना धूळ चारली आहे. त्याचबरोबर ‘ड्रीम गर्ल 2’ देखील ‘जवान’च्या कहरातून सुटू शकलेली नाही. (Dream Girl 2 film earnings drop on day 14)

अधिक वाचा-
ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
‘…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाही’; प्राजक्ता माळीचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा