Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड अरे वा! दृश्यम फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

अरे वा! दृश्यम फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये काम करून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री म्हणजे इशिता दत्ता. अनेक उत्तम भूमिकांमधून तिने प्रेक्षकांवर तिची छाप सोडली. मात्र अजय देवगण आणि तब्बू यांच्या ‘दृश्यम’ सिनेमाने तिला अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. सोहळा मीडियावर इशिता कमालीची सक्रिय आहे. ती सतत तिचे नवीन फोटो, रिल्स, व्हिडिओ पोस्ट करत लाइमलाइट मिळवत असते. मात्र आता इशिता एका चांगल्या आणि वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मीडियामधील माहितीनुसार लवकरच इशिता आई होणार असून, याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या इशिताचा एक व्हिडिओ व्हायला होत आहे, या व्हिडिओमध्ये ती तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत पापराझी यांनी सांगितले आहे की, इशिता लवकरच आई होणार आहे. सोबतच तिचे अभिनंदन देखील केले आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत इशिताला तिच्या या नवीन आयुशस्तही शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान इशिताने २०१७ साली अभिनेता वत्सल सेठसोबत लग्न केले होते. वत्सल देखील अनेक, मालिका आणि चित्रपटांमधून आपल्याला काम करताना दिसतो. त्याने अब्बास मस्तं यांच्या ‘टारझन द वंडर कार’मध्ये काम केले होते. इशिता ही बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण असून, तिने देखील बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयात करियर घडवले.

इशिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती दृश्यम २ मध्ये अखेरची दिसली. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याशिवाय तिने काही मालिकांमध्ये देखील काम केले आहे. हे पहिल्यांदा झाले असे नाही याआधी देखील इशिता प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र तेव्हा त्या अफवा सांगितल्या गेल्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा