दक्षिण चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपट गाजले आणि चित्रपटाचे रिमेक सुद्धा इतर भाषेमध्ये झाले आहे. असाच मल्याळम चित्रपटसृष्टी एक चित्रपट जो 2013 मध्ये एक सस्पेन्स थ्रिलर असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि सुपरस्टार मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट इतका यशस्वी झाला की तो इतर भाषेत रिमेक करण्यात आला. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो आहे ‘दृश्यम’. चित्रपट मूळतः एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
‘दृश्यम’च्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याची योजना आखली होती. पण निर्मात्यांनी आता प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित, मोहनलाल-अभिनीत हा चित्रपट आता 2 एप्रिलऐवजी मे महिन्यात प्रदर्शित होईल. पण आता चाहत्यांना एका महिन्याहून अधिक काळ वाट पाहावी लागेल. हि माहिती मोहनलालने स्वतः सोमवारी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे.
मोहनलालच्या (mohanlaal) पोस्टमध्ये म्हणले आहे कि, ‘दृश्यम 3’ आता 21 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. असे मानले जाते की ‘धुरंधर द रिव्हेंज’ला मिळालेली भरघोस ओपनिंग आणि येत्या काही महिन्यांत चित्रपटगृहांमध्ये अपेक्षित गर्दीमुळे ‘दृश्यम 3’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच ‘दृश्यम 3’चा रिमेक मल्याळम, कन्नड, तेलगू, तमिळ, हिंदी, सिंहली आणि मँडरिन चायनीजसह सात भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. ‘दृश्यम २’ कन्नड, तेलगू आणि हिंदीमध्ये बनवण्यात आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
तारक मेहता का उल्टा चश्माचा अभिनेता रणवीर सिंग वर पडतोय भारी, धुरंदर 2 मध्ये ठरला गेम चेंजर










