Monday, July 8, 2024

‘दृश्यम’ चित्रपटातील या अभिनेत्रीने देखील धरला ‘उ अंटावा’ गाण्यावर ताल, पाहून समंथाला देखील वाटेल कौतुक

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचीच हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या कथेने तर सर्वांना मोहित केलेच आहे मात्र चित्रपटातील गाण्यांनीही तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो रिल्स सोशल मीडियावर पाहायला म्ळत आहेत. यामध्ये चित्रपटक्षेत्रातील कलाकारांचा ही समावेश आहे. पुष्पा चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट आहेत मात्र सर्वात जास्त ‘ओ अंटावा’ गाण्याने धुमाकुळ घातला आहे. आता सोशल मीडियावर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा या गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.

सुपरस्टार अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या रहस्यमय कथेने सर्वांचे लक्ष वेधले होते. चित्रपटामध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिता दत्तच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात इशिताची भूमिका महत्वपूर्ण होती. चित्रपटातील यशामुळे इशिता चांगलीच लोकप्रिय ठरली होती. आता पुन्हा एकदा ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंटावा’ गाण्यावर केलेल्या डान्समुळे ती चर्चेत आली आहे.

इशिता २०२० पासून कोणत्याही चित्रपटात झळकली नसली तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे, ज्यांच्याशी ती अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. आताही तिने ‘ओ अंटावा’ गाण्यावरील डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. याआधीही इशिताचा ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या’ डायलॉगवरील व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तिच्यासोबत मैत्रिणीही होत्या. त्याचबरोबर आता चर्चेत असलेल्या ‘कच्चा बदामवरही’ तिने धमाकेदार डान्स केला होता. इशिताच्या चाहत्यांना तिचे हे व्हिडिओ खूपच आवडत असतात. तिचे इंस्टाग्रामवर २.१ मिलीयन इतके फॉलोअर्स आहेत.

दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहिण असलेल्या इशिताने २०१७ मध्ये ‘टार्जन द वंडर कार’ चित्रपटाचा अभिनेता वत्सल सेठसोबत विवाह केला होता. या दोघांची ‘सौदागर बाजीगर’ या कार्यक्रमाच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा