Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘आम्हाला राक्षसांसारखे दाखवण्यात आले’, एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले शाहरुखचे ‘ते’ वक्तव्य

‘आम्हाला राक्षसांसारखे दाखवण्यात आले’, एनसीबी अधिकाऱ्याने सांगितले शाहरुखचे ‘ते’ वक्तव्य

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अं’मली पदार्थ प्रकरणी क्लीन चिट मिळाली आहे. आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत एका क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली. यानंतर आर्यन काही दिवस तुरुंगातही होता. यादरम्यान शाहरुख खानने मुलगा आर्यनला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस एक केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर खान कुटुंबीयांकडून एकही वक्तव्य करण्यात आलेले नव्हते. त्याचवेळी आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर शाहरुख खानचे एक वक्तव्य समोर आले आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने याबाबत खुलासा केला आहे.

खरं तर, एनसीबी अधिकारी संजय सिंग यांनी एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी आर्यन खानच्या अटकेनंतर झालेल्या शाहरुख खान आणि त्यांच्या भेटीचा उल्लेख केला आहे. संजय सिंगने सांगितले की, शाहरुखने त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आर्यनच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल विचारले. किंग खानने एनसीबी अधिकाऱ्याला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी देण्याची विनंतीही केली होती. पण त्यांना ती देता आली नाही. (drug case ncb reveal that shah rukh khan statement)

संजय सिंग म्हणाले, शाहरुखने आरोप केला की, कोणत्याही पुराव्याशिवाय त्याच्या मुलाची बदनामी केली जात आहे. या संभाषणात शाहरुख खान पाणावलेल्या डोळ्यांनी असेही म्हणाला की, “आम्हाला एखादे मोठे गुन्हेगार किंवा राक्षसासारखे दाखवण्यात आले आहे, जे समाज नष्ट करण्यासाठी आले आहेत.”

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबर २०२१च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणी आणि २६ दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला त्याचा जामीन मंजूर केला. आर्यनची जामीन अभिनेत्री आणि शाहरुख खानची मैत्रिण जूही चावलाने (Juhi Chawla) केली होती. त्यावेळी अभिनेत्रीने एक लाखाचा बाँड भरला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा