Friday, July 5, 2024

एनसीबी कोठडीतही होतोय आर्यनचा पाहुणचार; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून मागवण्यात आली बिर्याणी

क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या पार्टीमध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला गुरुवारपर्यंत (७ ऑक्टोबर) एनसीबीच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे. मुंबईतील न्यायालयाने आर्यनसह तीन जणांची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, यादरम्यान आर्यनला सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. आर्यनचे आतापर्यंत जितकेही फोटो समोर आले आहेत, त्यामध्ये तो वेगवेगळ्या आणि फॅन्सी जॅकेटमध्ये दिसला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याच्या जेवणाचीही विशेष काळजी घेतली जात आहे.

प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून मागवली बिर्याणी
आर्यनने सांगितल्यानंतर एनसीबीने त्याच्यासाठी पुस्तके मागवली होती. मात्र, यासोबतच त्याच्यासाठी मुंबईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून बिर्याणीही मागवली. यापूर्वी जेव्हा शाहरुख आणि गौरी मुलगा आर्यनला भेटण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा ते त्याच्यासाठी बर्गर घेऊन पोहोचले होते. मात्र, आता स्वत: एनसीबीदेखील आर्यनचा जोरदार पाहुणचार करत आहे. विभागातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंटमधून आर्यनसाठी बिर्याणी मागवण्यात आली होती. (Drugs Case NCB Ordered Biryani From Famous Restaurant For Shahrukh Khans Son Aryan Khan)

कलाकारांमध्ये प्रसिद्ध आहे ‘बडे़ मियां’
विभागातील ‘बड़े मियां’ रेस्टॉरंट हे केवळ सामान्य लोकांसाठीच नाही, तर कलाकारांसाठीही प्रसिद्ध आहे. जेव्हाही कलाकार तिथे शूटिंग करत असतात, तेव्हा ते बिर्याणी मागवतात. अशामध्ये एनसीबी आर्यनला प्रत्येक सुविधा पुरवत आहे. रेस्टॉरंट एनसीबी कार्यलयाच्या जवळच असल्याने आर्यनला बिर्याणी देण्याचे सर्वात मोठे कारण सांगितले जात आहे.

रेस्टॉरंटमधून मागवू शकता जेवण
कायद्यानुसार, आर्यनसाठी जवळपासच्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवले जाऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, आर्यनला जेवणाच्या सुविधा जरी एनसीबीकडून देण्यात येत आहेत. मात्र, कपडे आणि इतर गोष्टी त्याने आपल्या घरून मागवले आहेत. एनसीबीने ज्या लोकांना ताब्यात घेतले आहे, त्यांना तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ठेवले असून आर्यनही त्यांच्यासोबतच आहे.

चाहत्यांचे मिळतंय समर्थन
या सर्वांमध्ये चाहते शाहरुख खानला प्रेम आणि समर्थन देत आहेत. बॉलिवूड कलाकारही या कठीण काळात शाहरुख खानला धैर्य राखण्यास सांगत आहेत. अनेक कलाकारा चाहत्यांकडे विनंती करत आहेत की, रिपोर्ट आल्याशिवाय आर्यनला दोषी ठरवू नका. माध्यमांतील वृत्तांनुसार दावा केला जात आहे की, शाहरुख खानच्या टीमने बॉलिवूड कलाकारांना आवाहन केले आहे की, त्याला भेटण्यासाठी त्याच्या ‘मन्नत’ या घरी येऊ नये.

आता आर्यनला जामीन मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणी अडकलेल्या आर्यन खानला गुरुवारी मिळणार जामीन? जाणून घ्या काय सांगतात प्रसिद्ध वकील

-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर

-पतौडी पॅलेसमधून होणाऱ्या कमाईबाबत सैफचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझी आईच घेते सर्व, मी फक्त नावापुरता…’

हे देखील वाचा