Saturday, June 29, 2024

‘शमशेरा’ची कथा ऐकून वाणीला आली संजय दत्त- माधुरी दीक्षितच्या ‘खलनायक’ची आठवण; म्हणाली, ‘असे चित्रपट पाहुन…’

चित्रपटसृष्टीत वाणी कपूर आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. वाणी तिच्या उत्तम अभिनयासोबतच तिच्या बोल्ड स्टाईलसाठीही ओळखली जाते. तिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्रीमध्ये केली जाते. वाणीने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहे, ज्याद्वारे तिने इंडस्ट्रीमध्ये आपले खास स्थान बनवले आहे. या सर्वांच्या दरम्यान ती बऱ्याचदा ती चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या वाणी रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात मुख्य भूमिका निभावण्यासाठी खूप उत्साही आहे.

‘शमशेरा’ चित्रपटाचे दिग्दर्शक करण मल्होत्रा हे आहेत. या चित्रपटाची कथा १९व्या शतकातील आहे. त्यात एक आदिवासी समाज आणि ब्रिटिश साम्राज्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. नुकतेच वाणीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “‘शमशेरा’ या चित्रपटाच्या स्क्रीप्टने मला संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या १९९३साली प्रदर्शित झालेली ‘खलनायक’ या चित्रपटाची आठवण करुन दिली.” ‘खलनायक’ चित्रपटाला दोनवेळा सर्वोत्तम चित्रपट म्हणून नामांकित करण्यात आले आहे.

तसेच ती म्हणते, “आपण लहानपणी ‘खलनायक’ आणि असेच अनेक चित्रपट बघून मोठे झालो आहोत. तसेच ‘शेमशेरा’ चित्रपट एक आगळी-वेगळी जगण्याची उमेद निर्माण करून देणारा चित्रपट आहे.” २०१९साली ‘वार’ या चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशनसोबत काम करण्याबद्दल वाणीने सांगितले की, ‘एक कलाकार म्हणून तिचा कल नेहमीच ‘ऍक्शन’ चित्रपटांकडे होता. तिला असे चित्रपट प्रचंड आवडतो.

वाणी पुढे म्हणाली, “मला करण मल्होत्राचा ‘अग्निपथ’ चित्रपट देखील खूप आवडतो. चित्रपटातील भावनिक दृश्ये खूप चांगल्या प्रकारे चित्रीत केली गेली आहेत. तसेच करण सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे खूप अप्रतिम संधी आहे. तर ‘शेमशेरा’मधील रणवीरचे पात्रही अप्रतिम आहे आणि ते चाहत्यांनाही खूप आवडेल.”

वाणी आणि रणवीर याशिवाय संजय दत्त ‘शेमशेरा’ चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता ,मात्र कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.‌ यानंतर वाणी तिच्या आगामी ‘चंडीगढ करे आशिकी’ चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा