तेलगू चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि रेडिओ जॉकी कौशिक एलएम आता या जगात नाही. चेन्नई येथे वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या बातमीने विशेषत: तेलुगू चित्रपटसृष्टी हादरली आहे. कौशिकच्या मृत्यूच्या बातमीनंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
ही दुःखद बातमी समोर आल्यानंतर दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. यामध्ये विजय देवरकोंडा, दुल्कर सलमान, अदिती राव हैदरी, कीर्ती सुरेश आणि व्यंकट प्रभू यांचा समावेश आहे. कौशिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत विजय देवरकोंडाने “तुझा विचार करत आणि देवाला प्रार्थना करतो. मला तुझी खूप आठवण येईल कौशिक. असे भावूक ट्विट केले आहे.
दुसरीकडे कीर्ती सुरेशने ट्विट केले की, “ही बातमी ऐकल्यानंतर माझ्याकडे काही बोलायला शब्द नाहीत. या बातमीवर विश्वास बसत नाही. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना आहे. कौशक आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही.” कौशिक एलएम यांना श्रद्धांजली वाहताना, दुलकर सलमाननेही चांगल्या सिनेमाला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे आभार मानले.
चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनीही कौशिकला श्रद्धांजली वाहिली आणि ट्विट केले की,”विश्वास बसत नाही. काही दिवसांपूर्वी त्याच्याशी बोललो. जीवन खरोखर अप्रत्याशित आहे. न्याय्य नाही. कौशिक यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांच्या मनःपूर्वक संवेदना. माझा मित्र खूप लवकर गेला.” आदिती राव हैदरीने श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा –
तमन्ना भाटियाच्या छोट्याशा कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मने, व्हायरल व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव
‘या’ बॉलीवूड कलाकाराचा विमान अपघातात झाला होता मृत्यू, पाहा यादी…..
‘रामायण’मध्ये ‘सीता’ साकारणाऱ्या अभिनेत्रीकडून मोठी चूक, स्वातंत्र्यदिनी करून बसली ‘हे’ कांड