Tuesday, July 9, 2024

खेसारील लाल यादवच्या ‘या’ गाण्यातील अभिनेत्री आहे फिटनेस फ्रीक; पाहा तिचा वर्कआऊट व्हिडिओ

भोजपूरी अभिनेता खेसारी लाल यादवच्या ‘दुपट्टा कतल करे’ या गाण्याचा नवीन व्हिडिओही प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तो एका महाविद्यालयीन मुलीच्या प्रेमात वेडा झालेला दाखवण्यात आले आहे. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री मोहिनी वर्ष्णेय आहे. प्रेक्षक मोहिनीच्या या गाण्यातील लूकला आणि अभिनयाला खूप पसंती देत आहेत. पण खऱ्या आयुष्यात ही मोहिनी खूप हॉट आणि बोल्ड दिसते. तसेच ती फिटनेस फ्रीकही आहे. अभिनेत्री मोहिनी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती अनेकदा तिचे व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडिओ चर्चेत आहे.

मोहिनी अनेकदा जिममधील व्यायाम करतानाचे व्हिडिओ शूट करत असते. तिने कित्येकदा जिममधील व्हिडिओ स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये ती स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासनतास घाम गाळताना दिसत आहे.

या व्यतिरिक्त बोलायचे झाले, तर मोहिंनीने भोजपूरी इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक व्हिडिओ गाण्यांमध्ये काम केले आहे. तिने ‘झांझर’, ‘दिल को करार आया’, ‘राउडी बेबी’, ‘घूंघट’ आणि ‘मसकारा’ यांसारख्या गाण्यांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांनी या गाण्यांना सोशल मीडियावर खूप प्रतिसाद दिला आहे.

याशिवाय मोहिनीने ‘अतिथि कब आओगे शमशान’ या चित्रपटात काम करताना साध्वीची भूमिका साकारली आहे. तसेच मोहीनीचे इंस्टाग्रामवर ४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. भोजपूरीमध्ये खेसारी लाल यादवसोबत काम करण्यापूर्वी मोहिनीने शिल्पा राज यांच्या ‘राहत’ या गाण्यात काम केले आहे. हे गाणे रौनक राऊत आणि मोहिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

आता ‘दुपट्टा कतल करे’च्या भोजपूरी गाण्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये खेसारी आणि मोहिनी यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप रंजक वळणावर नेत असल्याने हे गाणे चाहत्यांच्या खूप आवडीचे ठरत आहे. तसेच या व्हिडिओ गाण्याला यूट्यूबवर खूप प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकदम कडक! डान्सर आर सी उपाध्यायचे ठुमके पाहून तुम्हालाही येईल सपना चौधरीची आठवण

-अर्जुन रामपाल त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आणि मुलांसोबत घेतोय सुट्ट्यांचा आनंद, गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने शेअर केले फोटो

-काय सांगता! समंथा अक्किनेनी अन् नागा चैतन्यच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा