शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पाॅर्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक होऊन, जवळपास एक महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. राज सध्या तुरुंगात आहे आणि शिल्पा आता स्वतःला सांभाळताना दिसत आहे. ती देखील कामावर परत रूजू झाली आहे. शिल्पा स्वतःला स्ट्रॉंग बनविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही पुन्हा सक्रिय झाली आहे. ती सतत काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. यावेळी तिने चूकांबद्दल काहीतरी सांगत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
‘मी चूका करणार’
शिल्पाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे लिहिले की, “चूका या कर्जाचा एक भाग आहेत, ज्यासाठी एखाद्याला आयुष्यभर किंमत मोजावी लागते.” त्यात पुढे लिहिले की, “चूक केल्याशिवाय आपण आपले जीवन रंजक बनवू शकत नाही. आपण आशा करायला पाहिजे की, वेदनादायी चूका होऊ नये की, ज्याचा इतर लोकांना त्रास होईल. तरीही चूका या होत राहतात.”
शिल्पाने पुढे लिहिले की, “आपण चूकांकडे त्याच दृष्टीकोणातून बघायला पाहिजे, ज्याला आपण विसरू इच्छितो.” शिल्पाने शेवटी लिहिले की, “मी चूका करेन, मी स्वतःला माफ करेन आणि त्यातून नविन काहीतरी शिकेल.” या सोबत तिने एक स्टिकर शेअर केले आहे. ज्यात लिहिले आहे की, “मी चूक केली आहे, पण काही हरकत नाही.”
दरम्यान, शिल्पाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले की,“विश्रांती न घेता जगा… आपण आपल्या आयुष्यात पाॅजचे बटन दाबू शकत नाही. आपला प्रत्येक दिवस मोजला जातो. मग भले तो चांगला असो किंवा वाईट. काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ सतत चालत असते. आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वेळ. वेळ गमवण्यापेक्षा तुम्ही तुमचा प्रत्येक क्षण उत्तम जगा. मी देखील जेवढे माझ्याकडून शक्य आहे तेवढे माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण जगणार आहे.”
शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच सुपर डान्सरमध्ये परतली आहे. शिल्पा या शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. शिल्पा शोमध्ये परत आल्यामुळे सर्वजण खूप आनंदी झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खतरों के खिलाडी: उडालीय सर्वांचीच झोप, नेमकं कशाला घाबरलेत शोचे हे निडर स्पर्धक
-नुसरत जहाँ आई झाल्यानंतर, तिच्यापासून विभक्त झालेल्या पतीने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यात…’