Saturday, April 20, 2024

‘सरफरोश’ चित्रपटावेळी सोनाली बेंद्रेने आमीर खानकडून शिकण्याची गमावली होती संधी, व्यक्त केली खंत

लवकरच अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विनय वैकुल दिग्दर्शित ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबसिरीजमधून सोनाली तिचे ओटीटी पदार्पण करणार आहे. ही सिरीज ‘प्रेस’ या ब्रिटीश मालिकेचा हिंदी रिमेक असेल ज्यामध्ये सोनाली बेंद्रे न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिरीजची कथा मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या कार्यशैलीवर आधारित असेल. या कार्यक्रमाचे सध्या सोनाली जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशनदरम्यान सोनालीने तिचा ‘सरफरोश’ चित्रपट आणि अभिनेता आमीर खान बद्दलचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. काय आहे तो किस्सा चला जाणून घेऊ.

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकात सोनालीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले होते.सध्या अभिनय जगतापासून दुर असलेली सोनाली बेंद्रे लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ज्यामध्ये ती द ब्रोकन न्यूज या सिरीजमध्ये झळकणार आहे. सध्या ती या सिरीजचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशनवेळी सोनालीने तिच्या सरफरोश चित्रपटाचा एक किस्सा सांगितला आहे. ज्यामध्ये सोनाली बेंद्रे म्हणाली, “मी आता अपघाती अभिनेत्री नाही. मी आमिरसोबत ‘सरफरोश’ केला तेव्हा मला खूप मजा आली. ‘सरफरोश’च्या वेळी त्याच्याकडून शिकण्याची संधी मी गमावली,”त्याचबरोबर जर ओटीटी प्लॅटफॉर्म आले नसते तर आम्हाला दुसरी संधी मिळाली नसती, असेही सोनाली यावेळी म्हणाली.

सोनाली बेंद्रे वेब सीरिजची ही सिरीज 10 जूनपासून OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रीमियर होईल. त्याचा टीझर आणि ट्रेलर दोन्ही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले असून, यालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या सिरीजमध्ये सोनाली बेंद्रेसोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा