चार वर्ष जुन्या ड्रग्स प्रकरणात साऊथच्या टॉपच्या कलाकारांसोबत अनेक मोठ्या दिग्दर्शकांना ईडीने समन बजावले आहे. यामध्ये रकुल प्रीत सिंग, राणा डग्गुबती, रवी तेजा, पुरी जगन्नाथ आदी मोठ्या कलाकारांसोबत अन्य कलाकारांचा देखील समावेश आहे. प्रवर्तन निर्देशनालयाने यासर्वांना तारखेसोबत समन पाठवले आहे.
रकुल प्रीत सिंगला ६ सप्टेंबर, राणा डग्गुबतीला ८ सप्टेंबर, रवी तेजाला ९ सप्टेंबर आणि दिग्दर्शक पुरी जग्गनाथला ३१ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. सोबतच चार्मी कौर, मुमैथ आदी अनेक कलाकारांना देखील समन बाजवले आहेत. या चार वर्षे जुन्या प्रकरणात आतापर्यंत १२ लोकांना समन जारी केले आहे. (ed has summoned tollywood actors)
रकुल प्रीत सिंग, राणा डग्गुबती, रवी तेजा, पुरी जगन्नाथ यांना आरोपी ठरवण्यात आले नाही. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हे लोकं आरोपी आहेत की, नाही याबद्दल सांगणे खूपच घाई होईल.”
सन २०१७ साली तेलंगणाच्या उत्पादन शुल्क विभागाने ३० लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर १२ गुन्हे दाखल केले. त्यातील ११ प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल केल्यानंतर प्रवर्तन निर्देशनायालने उत्पादन शुल्क विभागाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या बाजूने चौकशी करण्यास सुरुवात केली होती. या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३० लोकांना अटक झाली असून, ६२ लोकांची चौकशी झाली आहे. या चौकशीदरम्यान टॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींची नावे समोर आली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पोन्नियन सेलवन’ सिनेमातील ऐश्वर्याचा फोटो लीक; अभिनेत्री दिसली ‘या’ अवतारात
-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ