Monday, July 1, 2024

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

सुकेश चंद्रशेखरला २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी आदिती यांच्याकडून २०० कोटींची खंडणी वसूल केली आहे. सध्या सुकेश तुरुंगात आहे. या प्रकरणी बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे.

या प्रकरणी जॅकलिनची एकदा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावत, शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु अभिनेत्री शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहिली नाही. त्यामुळे शुक्रवारी तिला पुन्हा एकदा समन्स बजावत शनिवारी ईडी कार्यालयात हजार राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणी सुरुवातीला जॅकलिनची चौकशी करण्यात आली तेव्हा ईडीला तिचाही यामध्ये हात असल्याचा संशय होता. मात्र चौकशीनंतर असे समोर आले की, अभिनेत्री स्वतः यामध्ये फसली गेली आहे. त्यामुळे ती या सर्व प्रकरणाची मोठी साक्षीदार असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. जॅकलिननंतर ईडीकडून अभिनेत्री नोरा फतेहीला देखील समन्स बजावण्यात आला होता. गुरुवारी तिची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकरणामध्ये सुकेशची पत्नी लीना पॉलचा देखील हात आहे. यामुळे ती आणि इतर चार आरोपी देखील पोलीस कोठडीमध्ये आहेत.

सुकेश चंद्रशेखरवर या आधी देखील काही गुन्हे दाखल झालेले आहेत. साल २०१७ मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणुकी दरम्यान लाच दिल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. टीटीवी दिनाकरन या व्यक्तीला त्याने लाच दिली असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या देखील त्याच्या निशाण्यावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच या प्रकरणी अभिनेत्री नोरा आणि जॅकलिनची चौकशी सुरू असल्याने अजून कोणत्या कलाकाराचे नाव या प्रकरणात येणार याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रेड स्वीमिंग सूटमध्ये कमाल दिसतेय रकुल प्रीत, पूलमध्ये पाहायला मिळाला बोल्ड अंदाज

-…म्हणून राहुल वैद्यला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवक्त्याने उघड केलं कारण

-समुद्रकिनारी पत्नी अंकितासोबत एन्जॉय करताना दिसले मिलिंद सोमण, व्हायरल होतोय रोमॅंन्टिक व्हिडिओ

हे देखील वाचा