बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ED) ने चौकशीसाठी बोलावले आहे. 6 ऑक्टोबरला रणबीर कपूरला ED च्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. हे संपूर्ण प्रकरण ‘महादेव बुक ऑनलाइन लॉटरी’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. या ऑनलाइन बेटिंग अॅपमुळे 17 बॉलिवूड स्टार ईडीच्या रडारवर आहेत.
काही आठवड्यांपूर्वी या प्रकरणात टायगर श्रॉफ, सनी लिओन, नेहा कक्कर आणि राहत फतेह अली खान यांसारख्या दिग्गजांची नावे समोर आली होती. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल तसतसा आलिया भट्टचा पती रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) चौकशी करावी लागणार आहे. दुबईत 200 कोटी रुपयांच्या लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर हे सर्व स्टार्स अडचणीत आले आहेत.
हे समन्स रणबीर कपूरसाठी एक मोठा धक्का मानला जातो. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकार आणि गायक ED च्या रडारवर आहेत. ईडीने UAE मधील अॅपच्या प्रवर्तकाच्या लग्न आणि सक्सेस पार्टीला जे उपस्थित होते त्यांची चौकशी सुरु आहे. रणबीर कपूरला या प्रकरणात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचा आरोप नाही. ईडीत्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार आहे.
बेकायदेशीर सट्टेबाजीच्या या प्रकरणात ईडीने आता मोठे पाऊल उचलले असून सेलिब्रिटींना समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. पहिले नाव रणबीर कपूरचे आहे.जेथे ईडी त्याला लग्नाला उपस्थित राहणे, परफॉर्म करणे, पेमेंट इत्यादींपासून इतर प्रश्न विचारू शकते. गेल्या महिन्यात ईडीने अनेक शहरांमध्ये छापे टाकले होते. या छाप्यात 417 कोटी रुपयांची मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या लग्नाची माहिती आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर ही बाब समोर आली. प्रवर्तकाने फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये लग्न केले. जिथे त्यांनी पाण्यासारखे 200 कोटी रुपये खर्च केले होते. (ED summons actress Alia Bhatt husband Ranbir Kapoor in Mahadev book online lottery case)
आधिक वाचा-
–वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी अनुष्का शर्माची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, ‘जर तुमच्या…’
–‘लग्नाची बेडी’मधील ‘सिंधू’ दिसते खूपच HOT अन् ग्लॅमरस