Sunday, August 3, 2025
Home अन्य विना परवानगी फोटोशूट केल्याने मॉडेल अडचणीत, तर फोटोग्राफरला अटक

विना परवानगी फोटोशूट केल्याने मॉडेल अडचणीत, तर फोटोग्राफरला अटक

आपल्याकडे प्रत्येक सेकंदाला अगणित फोटो कादंगले जातात. मग ते मोबाईलमध्ये असो किंवा डीएसएलआर मध्ये! ऐतिहासिक वस्तूंसमोर फोटो काढण्यास कोण उत्सुक नसतो. समजा ताजमहल समोर फोटो काढल्यामुळे आपल्याला जर अटक केली गेली तर… विचारच करवत नाही ना… असं कोण करतं? परंतु इजिप्तमध्ये एका मॉडेलला पिरॅमिडसमोर फोटोशूट करणं महागात पडलं आहे. पोलिसांनी या मॉडेलचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरलाच अटक केली आहे. वैश्विक संपत्ती मानल्या जाणाऱ्या पिरॅमिड समोर फोटो काढल्याचा आरोप या फोटोग्राफरवर ठेवण्यात आला आहे.

माध्यमांकडून असंही समजतंय की फोटोग्राफरने फोटोशूट करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. जेव्हा मॉडेल सलमा-अल-शिमीचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध झाले त्यावेळी पोलिसांनी या सर्व प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली. तपासादम्यान आढळून आलं की विनापरवानगी तिथे हे फोटोशूट झालंच कसं? आणि जर झालं तर तिथे कोणतेही अधिकारी कसे नव्हते?

आता हे सर्वश्रुत आहे की इजिप्तचे पिरॅमिड हे जगातील सात आश्चर्यापैकी एक आहेत. इतकंच नव्हे तर तेथील लोकांच्या धार्मिक भावनदेखील या पिरॅमिडसोबत जोडल्या गेल्या आहेत. जिथे हे फोटोशूट करण्यात आलं ती जागा सक्काराचं विशाल कब्रस्तान आहे. ज्याचा इतिहास जवळपास तीनहजार वर्षांपूर्वीचा आहे.

हे देखील वाचा