Saturday, July 6, 2024

बिग बॉस : एजाजची अंतिम फेरीत धडक, सर्वांना सांगितलं आयुष्यातील ‘ते’ भयानक सत्य; बोलताना रडूही आवरेना

नेहमीच विवादित ठरणारा, मात्र प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करणारा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजेच ‘बिग बॉस’. यावर्षी बिग बॉस या कार्यक्रमाचा १४ व सिझन आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरु झालेला हा सिझन आता हळू हळू अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. नुकताच बिग बॉस ला या पर्वाचा पहिला फाइनलिस्ट मिळाला आहे. एजाज खान हा या पर्वाचा पहिला फाइनलिस्ट ठरला आहे.

अंतिम चार मध्ये येण्यासाठी स्पर्धकांना एक कार्य दिले गेले होते. कार्यांतर्गत आपल्या आयुष्यातील एक रहस्य उघड करायचे होते. ज्याचे रहस्य मनाला भावेल तो या कार्याचा विजेता असेल आणि त्याला इम्युनिटी स्टोन मिळून तो अंतिम फेरीत पोहचेल. या कार्यात सर्व स्पर्धकांनी त्यांची अनेक गुपितं उघड केली.

एजाज खानने सांगितले, ” मी माझे आता जे रहस्य सांगणार आहे ते माझ्या वडिलांना देखील माहित नाही. मला स्पर्शाची भीती वाटते. लहान असताना मी शारीरिक दुर्व्यवहाराला बळी पडलो होतो. खरंतर ही गोष्ट मी पूर्णतः विसरलो होतो. मात्र मागच्या काही वर्षात मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक थेरपी चालू केली तेव्हा ही गोष्ट पुन्हा माझ्यासमोर आली. माझ्यासोबत जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी एका विचित्र मानसिक स्थितीत होतो, घाबरलो होतो त्यामुळेच कदाचित मी माझ्या वडिलांना याबद्दल काही सांगू शकलो नाही. त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. मला ही गोष्ट काबुल करायला कुठलीच लाज अथवा भीती वाटत नाही कारण, जे झाले त्यात माझी काहीच चूक नव्हती.” हे गुपित सांगितल्यानंतर एजाजला या कार्याचा विजेता म्हणून घोषित केले.

एजाज सोबतच रुबिना दिलायक, अभिनव शुक्ला, निकी तांबोळी, जस्मिन भसीन आणि कविता कौशिक यांनी देखील त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड केली. मात्र पनलिस्टवर असलेले काम्या पंजाबी, देबोलींना भट्टाचार्य, संदीप सिकंद आणि रोनित बिस्वास यांनी एकमताने एजाजला विजेता घोषित करताना सांगितले की, जे गुपित एजाजने सांगितले ते नॅशनल टीव्हीवर सांगण्यासाठी खूप हिम्मत लागते. त्यामुळे एजाज खानला या टास्कचा विजेता आम्ही घोषित करत आहे.

एजाज खान सोबत अंतिम फेरीत कोण पोहचेल हे बघण्यासाठी सगळे उत्सुक आहे.

हे देखील वाचा