आपल्या मित्रांबरोबर आपण अनेकवेळा भांडतो. काही वेळा भांडण आणि अबोल्यामुळे मैत्रीतील दुरावा आणखी वाढतो. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सुरू असलेल्या घटनांची दखल घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. परंतु अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून आणि या जगातून निघून गेली आहे असे समजते, तेव्हा जिवलगांच्या पायाखालची जमीनच सरकते. असाच काहीसा प्रकार एजाज खानसोबत घडला आहे.
गुरुवारी ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला. सर्वांनीच त्याच्याविषयी हळहळ व्यक्त केली. त्याच्या मृत्यूमुळे अनेकांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तसेच अजूनही त्याचे अनेक चाहते आणि मित्र त्याच्या आठवणीत सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त करत आहेत. ‘बिग बॉस १४’चा स्पर्धक एजाज खानने देखील त्याच्याविषयी मनामध्ये असलेल्या भावना एका पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. (Eijaz Khan share emotional post and says sorry to Siddharth Shukla after his death)
एजाजने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. जे अर्धवट राहीलं आहे. आता ती गोष्ट तुला कशी सांगू हे मला समजत नाहीये. सगळ्यात पहिले, तर मनापासून सॉरी. मी तुला भेटण्याचा आणि फोन करण्याचा प्रयत्न नाही केला. मला नाही माहित मी असं का केलं. कदाचित मी कामामध्ये व्यस्त होतो. मला असं वाटायचं आपण कधी ना कधीतरी एकमेकांना भेटू. आता या गोष्टीवरून मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत.”
सिद्धार्थच्या आठवणीत त्याने पुढे लिहिले की, “तिकडे बिग बॉसच्या घरामध्येच तुझ्याविषयी मनात प्रेम निर्माण झालं होतं. तिथे फक्त तूच मला समजून घ्यायचास. मी माझ्या आयुष्यात इतक्या जवळून कोणाला ओळखलं नव्हतं. तुझी तत्व, न घाबरता बोलणं, प्रत्येक गोष्टीवर अडून राहणं… या सर्व गोष्टींमधून तू आम्हाला शिकवत होतास की जिंकेपर्यंत हार नाही मानायची.
पुढे भावुक होऊन त्याने लिहिले की, “तुझं प्रत्येक टास्क पूर्ण करणं, तुझं नेहमी मला समजवून सांगणं चारित्र्याची शक्ती किती महत्वाची आहे. स्वतःच खरं आणि योग्य मत समोरच्या पुढे मांडणं आणि समोरच्याला ते पटवून सांगणं. भावा तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही होऊ शकलं. मी प्रयत्न केला. धन्यवाद भावा.
तसेच एजाज पुढे म्हणाला की, “मला जसजसे तुझ्याबद्दल समजत होते, तसतसे मला तुझे लाड करावेसे वाटत होते. एका ठराविक वयानंतर आपली कुणाबरोबर चांगली मैत्री होत नाही. कारण तेवढा वेळच नसतो आपल्याकडे. परंतु माझी तुझ्याबरोबर मैत्री झाली. मला अजूनही माहित आहे, तुला कोणतं जेवण आवडायचं. तू कशा पद्धतीने वर्कआउट करायचास हे सर्व मला आठवत आहे. मी तू सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवेन आणि माझ्या आयुष्यात तशा पद्धतीने वागायचं प्रयत्न करेन. धन्यवाद भावा तू माझ्या आयुष्यातला एक भाग बनण्यासाठी.”
एजाज खानच्या या पोस्टने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील सर्व मंडळी भावुक झाली आहेत. अजूनही सिद्धार्थचे असे जाणे अनेकांना पचलेले नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ
-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…