[rank_math_breadcrumb]

‘एक दिन’मधून साई पल्लवीचा बॉलिवूड डेब्यू, आमिर खानच्या मुलासोबत पहिला लूक समोर; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

आमिर खान सध्या एकाच वेळी अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहेत. त्यांचा लेटेस्ट प्रोडक्शन चित्रपट ‘हैप्पी पटेल: खतरनाक जासूस’ 16 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान त्यांनी त्यांच्या आणखी एका आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होणारा रोमँटिक चित्रपट ‘एक दिन’ 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

15 जानेवारी 2026 रोजी आमिर खान (Aamir Khan)प्रोडक्शन्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या नावाची आणि रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे,
“जगण्याच्या धावपळीत प्रेम तुम्हाला शोधून काढेल… एक दिन.”मेकर्‍सनी हेही सांगितले की या चित्रपटाचा टीझर 16 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान प्रेमात असलेल्या जोडप्याच्या भूमिकेत दिसत आहेत. दोघेही हिवाळी कपड्यांत, बर्फाच्छादित परिसरात आइसक्रीमचा आनंद घेताना दिसतात. त्यांच्या लूकवरून ते कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणींच्या भूमिका साकारत असल्याचे संकेत मिळतात. हा चित्रपट सुनील पांडे दिग्दर्शित असून, पटकथा स्नेहा देसाई आणि स्पंदन मिश्रा यांनी लिहिली आहे.

‘एक दिन’ हा चित्रपट आमिर खान आणि मन्सूर खान यांची 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणारी निर्मिती आहे. याआधी या जोडीने 2008 मधील सुपरहिट चित्रपट ‘जाने तू… या जाने ना’ ची निर्मिती केली होती.

जुनैद खानने ऐतिहासिक चित्रपट ‘महाराज’ मधून अभिनयात पदार्पण केलं आणि त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक झालं. त्यानंतर तो ‘लवयापा’ या रोमँटिक ड्रामामध्ये खुशी कपूरसोबत झळकला. दुसरीकडे, साई पल्लवीसाठी ‘एक दिन’ ही पहिलीच हिंदी फिल्म आहे. यानंतर ती नितेश तिवारी यांच्या भव्य चित्रपट‘रामायण’ मध्ये रणबीर कपूर आणि यशसोबत सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

एकूणच, ‘एक दिन’ या चित्रपटामुळे साई पल्लवीचा बॉलिवूड डेब्यू आणि जुनैद खानची रोमँटिक भूमिका प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

धमाकेदार IMDb रेटिंग असलेला हा चित्रपट पाहताना गळ्याखाली पाणीही उतरणार नाही, ट्विस्ट असा की ‘दृश्यम’चा सस्पेन्सही फिका वाटेल