Friday, December 1, 2023

बॉलिवूडमधील लोकप्रिय असणाऱ्या ‘या’ कलाकारांना क्वीन एकता कपूरने केले लाँच

पूर्वी टीव्ही आणि चित्रपट हे दोन वेगळे क्षेत्र होते. तसे आजही आहे, मात्र आज टेलिव्हिजन क्षेत्र चित्रपटांच्या तोडीस तोड उभे आहे. या क्षेत्राची पोहोच आणि लोकप्रियता पाहून अनेक बॉलिवूड कलाकार या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असतात. आजच्या या टीव्हीच्या झालेल्या मोठ्या बदलात हात आहे तो डेलीसोप क्वीन एकता कपूरचा. एकता कपूर नाव जरो उच्चारले तरी डोळ्यसमोर मोठ्या हिट आणि प्रसिद्ध मालिकांच्या नावांची रांग उभी राहते. आपल्या हटके विचार पद्धतीने एकताने टीव्हीला एक वेगळी ओळख आणि स्थान प्राप्त करून दिले आहे. जे काम एकताने टीव्हीसाठी केले तो कोणीच केले नव्हते. म्हणूनच एकताचे टीव्ही कलाकारांच्या नजरेत एक मोठे स्थान आहे. एकताने आजपर्यंत अनेक कलाकारांना लाँच केले आणि त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. हेच कलाकार पुढे बॉलिवूडमध्ये गेले आणि त्यांनी तिथे देखील लोकप्रियता मिळवली. अशात बुधवारी ( दि. 7 जून)ला एकता कपूर तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया तिने लाँच केलेल्या काही कलाकारांबद्दल…

विद्या बालन :
एकताच्या बालाजी टेलिफिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने 1995 साली झी टीव्हीसोबत एक शो केला त्याचे नाव होते ‘हम पांच’ या शोने तुफ़ान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. अतिशय विनोदी असणारा हा शो आजही कोणी विसरू शकलेले नाही. या शोच्या माध्यमातून एकताने विद्या बालनला लाँच केले होते. त्यानंतर सुरु झालेला विद्याचा प्रवास आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री पर्यंत येऊन पोहचला आहे.

सुशांत सिंह राजपूत :
आपल्या प्रभावी आणि दमदार अभिनयातून लोकांची मने जिंकणाऱ्या सुशांत सिंग राजपूतला इंडस्ट्रीमध्ये एकता कापूरनेच लाँच केले होते. एकताची सुपरहिट मालिका असलेल्या ‘पवित्र रिश्ता’मध्ये तिने त्याला मुख्य भूमिका दिली आणि सुशांतचे नशीबच पालटले. त्यानंतर तो बॉलिवूडमध्ये गेला आणि तिथे देखील त्याने त्याची छाप पाडली. आज जरी सुशांत जगात नसला तरी त्याचा अभिनय आणि त्याचे सिनेमे सदैव लोकांच्या मनात आहे.

Photo Courtesy: Instagram/sushantsinghrajput

रोनित रॉय :
टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारा अभिनेता रोनित रॉयला देखील एकता कपूरनेच लाँच केले आहे. रोनितने 1992 साली ‘जान तेरे नाम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्याला चित्रपटांमध्ये खास यश मिळाले नाही. पुढे त्याने एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेसाठी त्याला 8 आठवड्यांच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेची ऑफर मिळाली. मात्र त्याची भूमिका आणि अभिनय लोकांना एवढा आवडला की त्याला एकताच्या ‘क्यों की…’ मालिकेत मुख्य भूमिका मिळाली.

प्राची देसाई :
टीव्ही आणि बॉलिवूड दोन्ही क्षेत्रांमध्ये नाव कमावलेली अभिनेत्री प्राची देसाई देखील एकता कपूरचीच देण आहे. एकताने प्राचीला तिच्या ‘कसम से’ मालिकेतून लाँच केले. याआधी तिने कसोटी मालिकेत एक छोटी भूमिका केली होती. कसम से मध्ये ‘बानी’ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या प्राचीला साली ‘रॉक ऑन’ सिनेमा मिळाला आणि ती बॉलिवूडमध्ये गेली.

राजीव खंडेलवाल :
टेलिव्हिजन विश्वात एकता कपूरने राजीव खंडेलवालला लाँच केले. ‘क्या हादसा क्या हकीकत’ शोमध्ये राजीव नकारात्मक भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याला बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘कहीं तो होगा’ मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आणि तो टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय झाला. पुढे त्याने ‘आमिर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

याव्यक्तिरिक्त अनेक कलाकारांना एकताने ब्रेक दिला आणि त्यांनी एकताने दिलेल्या संधीचे सोने केले.(ekta kapoor birthday thease actors launched by ekta kapoor)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुणीतरी येणार गं! अभिनेत्री स्वरा भास्करने दिली गुडन्यूज; पोस्ट शेअर करत म्हणाली…
‘बाईपण भारी देवा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाच्या शीर्षक गीताचे लॉन्चिंग थेट महालक्ष्मीच्या मंदिरातून

हे देखील वाचा