Tuesday, March 24, 2026
Home बॉलीवूड ‘नागिन 7’मध्ये AI चा ओव्हरडोस? या वादावर एकता कपूरची रिएक्शन, म्हणाली -प्रत्येक सीनमध्ये ड्रॅगन हवा

‘नागिन 7’मध्ये AI चा ओव्हरडोस? या वादावर एकता कपूरची रिएक्शन, म्हणाली -प्रत्येक सीनमध्ये ड्रॅगन हवा

एकता कपूर ही एक निर्माता म्हणून सिनेसृष्टीत अनेक वर्ष उत्तम काम करत आहे. आणि अनेक मालिकांची निर्मिती केली तसेच त्या गाजले आहे सध्या चर्चेत असलेली एकता कपूर तिची मालिका म्हणजे नागिन 7 ती सध्या चर्चेत आहे. तर या नागिन मालिकेमध्ये अक्षय कुमार दिसणार आहे,आणि तो भूत बंगला या त्याच्या आगामी चित्रपटासाठी प्रमोशनल एपिसोड यासाठी तो शुट करणार आहे, तर त्याचे चित्रीकरण केले आहे आणि यामध्ये एआयचं वापर केला आहे. तर याच कारणामुळे ai चा अतिवापर असल्याने चाहते आता एकता कपूर यांच्याकडे तक्रार करत आहे.

एकता कपूरने आता मौन सोडले आहे. ‘नागिन 7’ मधील एआयचा वापर हा वादाचा विषय ठरला आहे. प्रेक्षक याबद्दल एकता (Ekta)कपूरकडे सातत्याने तक्रार करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, एकताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते, “नागिन 7 च्या एआय एपिसोडमुळे मला खूप द्वेषपूर्ण प्रतिक्रिया मिळत आहेत.” त्यानंतर, एकता कपूर मीटिंग रूममध्ये तिच्या शेजारी बसलेल्या लेखकांकडे कॅमेरा वळवते. तसेच त्यांच्याकडे बोट दाखवत हलक्याफुलक्या स्वरात म्हणते, “दोष माझा नाही, त्यांचा आहे. त्यांना एआयची भूक लागली आहे. मी निर्दोष आहे. हे ते तिघे लोक आहेत ज्यांना प्रत्येक सीनमध्ये विमान, हे, ते हवं असतं, मला ड्रॅगन हवा, विमान हवं… आणि तेही बजेटशिवाय.

‘नागिन 7’ मध्ये प्रियांका चहर चौधरी ही मुख्य भूमिकेत आहे. या अलौकिक मालिकेत नामिक पॉल आणि ईशा सिंग यांच्याही भूमिका आहेत. या सीझनचा प्रीमियर 27 डिसेंबर, 2025 रोजी झाला होता. आणि अत्यंत प्रेम या मालिकेला चाहत्यानकडुन मिळत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रजनीकांतनी ‘धुरंधर 2’चं केलं कौतुक, अन् आदित्य धरला म्हणले ‘बॉक्स ऑफिसचा बाप’

हे देखील वाचा