‘ए गरम बांगड्या गरम बांगड्या’, हीच का ती ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये झळकलेली ‘झेंडू’? फोटो पाहून ओळख पटणेही आहे कठीण


‘ए गरम चाय गरम चाय, ए गरम बांगड्या गरम बांगड्या’ हे ऐकताच तुमच्या डोक्यात नक्कीच झेंडू आली असेल. हो तीच ती ‘एलिझाबेथ एकादशी’ मधली झेंडू. २०१४ साली आलेला ‘एलिझाबेथ एकादशी’ हा एक बालपट आहे, जो प्रचंड गाजला. मुख्य भूमिकेत असणाऱ्या ज्ञानासोबतच झेंडू देखील भलतीच भाव खाऊन गेली. तिचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत.

चित्रपटात झेंडू अर्थातच ‘मुक्ता’ची भूमिका ही बालकलाकार सायली भंडारकवठेकर हिने साकारली होती. तिने ज्याप्रकारे अभिनय केला, ते पाहून सर्वत्र तिचे कौतुक करण्यात आले होते. अभिनयाशिवाय सायलीला नृत्यामध्ये देखील प्रचंड आवड आहे आणि तिला नृत्यप्रकार भरतनाट्यममध्ये कारकीर्द घडवायची आहे. अगदी लहानपणापासूनच तिने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती.

सायली ही मूळची पंढरपूरची. मागच्या वर्षीच ती दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. खास गोष्ट म्हणजे ती अभ्यासात खूप हुशार आहे. रुपेरी पडद्यावर गणितात १०० पैकी ४२ गुण मिळवलेल्या सायलीने, प्रत्यक्षात मात्र गणितात १०० पैकी एकूण ९६ गुण मिळवले होते. तर एकंदरीत ती दहावीची परीक्षा ९८ टक्क्यांनी उत्तीर्ण झाली. (elizabeth ekadashi fame zendu now looking like this see)

परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यात श्रीरंग महाजन आणि सायली भंडारकवठेकरसह अभिनेत्री नंदिता धुरी, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकार देखील मुख्य भूमिकेत होते. आपली सायकल वाचविण्यासाठी या लहानग्यांनी ज्याप्रकारे जीवाचा आटापिटा केला, ते पाहून प्रेक्षक चांगलेच प्रभावित झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘अक्षय कुमारला मीच स्टार बनवले, नाहीतर तो…’ लाईव्ह सेशनमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मोठा दावा

-ऐश्वर्याला अशाप्रकारे मिळाली होती ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील नंदिनीची भूमिका; दिग्दर्शकाने केला होता खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.