Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड इमरान हाश्मीने सांगितले कसा बनला तो ‘सिरियल किसर’?; म्हणाला, ‘आता किस करून थकलोय…’

इमरान हाश्मीने सांगितले कसा बनला तो ‘सिरियल किसर’?; म्हणाला, ‘आता किस करून थकलोय…’

अभिनय क्षेत्रामध्ये एखादा चित्रपट हिट होण्यासाठी फक्त स्टोरी चांगली असून चालत नाही, त्यासाठी कलाकारांनी दमदार अभिनय करणे देखील गरजेचे आहे. अनेक चित्रपट तर असे असतात की, त्यांना काहीच स्टोरी नसते. परंतु त्यातील मसालेदार आणि रोमँटिक सीनमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. अशा चित्रपटांमध्ये किसिंग सीनसाठी ओळखला जाणारा इमरान हाश्मी आता एका गोष्टीला वैतागला आहे आणि ते ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.

इमरानचा आगामी चित्रपट ‘चेहरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “माझ्या चित्रपटाच्या कारकिर्दीमध्ये मी जास्त किसिंग सीन असलेलेच चित्रपट केले आहेत. त्यामुळे अनेकांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बऱ्याच लोकांना असे वाटते की, मी माझ्या चित्रपटातील प्रत्येक हिरोईनला किस करत असतो. गेली १० वर्षे मी हेच काम करत आहे. त्यामुळे आता मी स्वतःला ‘ सिरीयल किसर’ हा टॅग दिला आहे.” इमरानने हा टॅग गमतीमध्ये दिला होता, पण आता त्याच्या या टॅगमुळे तो चर्चेचा विषय बनला आहे. (emraan hashmi reveals who tagged him serial kisser and why he is sick of being a guy who was kissing all heroines)

इमरान आपल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला की, “मी आता किस सीन करून थकलो आहे. प्रत्येक हिरोईनला किस करून आता मी थोडा कमजोर झाल्याचे मला जाणवत होते. माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत होते. परंतु मला असं वाटत होतं की, माझ्यामध्ये एक अभिनेता आहे, ज्याला काहीतरी वेगळं पाहिजे.” मुलाखती दरम्यान त्याला ‘टायगर ३’ मध्ये तू आहेस का असे विचारले गेले. त्यावर अभिनेता म्हणाला की, “मला सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा आहे. परंतु मी ‘टायगर ३’ साठी शूटिंग केलेले नाही.”

इमरानने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये ‘मर्डर’, ‘गॅंगस्टर’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘मर्डर २’, ‘जन्नत २’ अशा अनेक रोमँटिक आणि हॉरर चित्रपटांमध्ये त्याने आपल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला ‘शंघाई’ आणि ‘टायगर्स’ या चित्रपटांमधून देखील चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. त्याने अरमान मलिकने गायलेल्या ‘मे रहू या ना रहू’ या अल्बम सॉंगसाठी अभिनय केला होता. त्याच्या या गाण्यालादेखील प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा