Tuesday, July 9, 2024

बॉलिवूडची पाकिस्तानलाही भुरळ! ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मीचा ‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी झाली होती लाहोरच्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी

हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इमरान हाश्मीला जगभरात ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखले जाते. जेव्हा बॉलिवूडमध्ये किसिंग सीनचा ट्रेंड सुरू झाला होता, तेव्हा इमरानने असे अनेक चित्रपट केले, ज्यात अनेक किसिंग होते. इमरान हाश्मीचे पूर्ण नाव, सय्यद इमरान अन्वर हाश्मी आहे. त्याने बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्याकाळी चित्रपटातील इमरानची पात्रे नेहमीच चर्चेत असायची आणि म्हणूनच इमरान हाश्मी त्याच्या वेगवेगळ्या पात्रांसाठी ओळखला जातो. पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की, चित्रपट पार्श्वभूमीमधून येणाऱ्या या मुलाला, त्याच्या पहिल्या चित्रपटातून काढून टाकले गेले होते. तथापि, घटनेच्या जवळपास सहा वर्षांनंतर, भारतीय अभिनेत्याचा एक चित्रपट पाहण्यासाठी, पाकिस्तानच्या चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

इमरान हाश्मीचा पहिला चित्रपट ‘फुटपाथ’ फारसा यशस्वी झाला नव्हता, परंतु चित्रपटाने लावलेली त्याची किंमत वसूल केली. त्याच वेळी, इमरानचा दुसरा चित्रपट ‘मर्डर’ मध्ये मल्लिका शेरावत सोबतचे त्याचे किसिंग सीन बरेच चर्चेत होते. ‘मर्डर’ २००४ मधील सर्वात हिट चित्रपट मानला जातो. या चित्रपटानंतर इमरानला ‘सिरीयल किसर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

या दरम्यान इमरानने ‘जहर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’ आणि ‘गँगस्टर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. जेव्हा २००८ मध्ये त्याचा ‘जन्नत’ हा चित्रपट आला, तेव्हा या चित्रपटाने इमरानला टॉप स्टार्सच्या लीगमध्ये स्थान मिळवून दिले. मॅच फिक्सिंगवर आधारित या चित्रपटात इमरानने बुकीची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील प्रपोजल सीनचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. जेव्हा हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला होता, तेव्हा लाहोरमधील थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी झाली होती.

विशेष म्हणजे, अभिनेता म्हणून नाव कमावलेल्या इमरान हाश्मीला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याला अ‍ॅनिमेशन क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा होती. इमरानला बॉलिवूडमध्ये प्रवेश करायचा नसला, तरी त्याचे बॉलिवूडशी खूप जवळचे नाते होते. महेश भट्ट हे त्याचे काका आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून इमरानने ‘राज’ आणि ‘कसूर’सारख्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यावेळी महेश भट्ट यांनी त्याला अभिनय करण्याचा देखील सल्ला दिला होता.

इमरानने भट्ट कॅम्पच्या ‘फुटपाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि इमरानने यात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. यानंतर, त्याने ‘मर्डर’ या चित्रपटात काम केले, ज्यामुळे त्याची कारकीर्द योग्य मार्गावर आली आणि तो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.

इमरान हाश्मीने ‘राज’, ‘मर्डर’, ‘कलयुग’ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये आपला हात आजमावला आहे आणि सिद्ध केले आहे की, तो कोणत्याही प्रकारचे पात्र सहजपणे करू शकतो. हिंदी चित्रपटसृष्टीत केलेल्या मोजक्या मूठभर चित्रपटामुळे त्याचे खूप कौतुक झाले आहे. ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’, ‘शांघाई’ यांसारख्या चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा