Tuesday, July 9, 2024

चित्रपटातील किसींग सीनबद्दल इमरान हाश्मीचे मोठे वक्तव्य, म्हणतो ‘मला किस करायला काहीच…’

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा चित्रपटात त्याच्या अभिनया व्यतिरिक्त त्याचा बोल्ड अंदाज आणि किसींग सीनमुळे खूप चर्चेत असतो. त्यानी 2003 मध्ये आलेल्या ‘फूटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याला अनेक चित्रपटात काम मिळाले. त्याच्या अनेक चित्रपटात त्याने बोल्ड किसींग सीन दिले आहेत. त्याच्या या सीनमुळे त्याला बॉलिवूडमधील ‘सीरियल किसर’ असे नाव पडले आहे.

चित्रपटात किसींग सीन देण्यावरून इमरानने एक गोष्ट सांगितली आहे. एका मुलाखतीत तो म्हणतो की, “तुम्ही एकच गोष्ट किती वेळा करू शकता? मी काही खास शैलीमध्ये प्राविण्य मिळू इच्छितो, आणि वेगवेगळी पात्र निभावयची आहेत. मला आताही कोणत्याही चित्रपटात किसींग सीन देण्यास काहीच अडचण नाही. मला वाटते ही गोष्ट फक्त त्या कहाणीला पुढे घेऊन जात असते की, माझे पात्र नक्की काय करत आहे. जेव्हा पासून दिग्दर्शकांनी मला या भूमिका देण्यास सुरुवात केली ज्या मला करायला आवडतात, तेव्हा मी कोणताही विचार न करता या भूमिका निभावण्यास सुरुवात केली.”

इमरान हाश्मीने पुढे सांगितले की, “काही व्यक्ती किसींग सीनबद्दल दबक्या आवाजात बोलतात, आणि हे सीन मोठ्या पडद्यावर बघण्याची अपेक्षा देखील ठेवत नाहीत. त्यांना असे वाटत असेल की, मी एक वेगळी गोष्ट घेऊन आलोय पण तस नाहीये. मी फक्त माझे पात्र निभावत होतो. मी फक्त एका अभिनेत्याच्या रूपाने दिग्दर्शकाच्या कल्पनेतील चित्र उभे करण्याचा प्रयत्न करत असतो.”

याव्यतिरिक्त त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. इमरान लवकरच त्याच्या आगामी चित्रपट ‘चेहरे’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रिया चकवर्ती, क्रिस्टल डिसूझा, अमिताभ बच्चन आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रिया चक्रवर्तीमुळे ‘चेहरे’ अडचणीत; मात्र निर्मात्यांचा अभिनेत्रीला पूर्ण पाठिंबा!

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

हे देखील वाचा