Saturday, June 29, 2024

ऐकावं ते नवलच! इंग्लंडच्या शाळेतील मुले गिरवणार मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम हुई’चे धडे

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंग्लंडमधील शाळांसाठी शुक्रवारी (२६ मार्च) नवीन संगीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला. यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, बॉलिवूड हिट आणि भांगडा बीटचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला आहे.शिक्षण विभागाने अर्थात डीएफईने म्हटले की, “इंग्लंडमधील सर्व शाळांसाठी या योजनेचा हा उद्देश आहे की, अधिकाधिक तरुणांना संस्कृतीच्या माध्यमातून संगीताबद्दल ऐकण्याची आणि शिकण्याची संधी देणे.”किशोरी आमोणकर यांचे ‘सहेला रे’, अनुष्का शंकरचे ‘इंडियन समर’, एआर रहमानचे ‘जय हो’ आणि बॉलिवूडमधील सुपर हिट झालेले ‘मुन्नी बदनाम हुई’ गाणी इंग्लंडच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संगीत अभ्यासक्रमातील संदर्भापैकी एक आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्येे म्हटले आहे की, आधुनिक ब्रिटिश ओळख समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे, हे कबूल करणे महत्त्वाचे आहे. त्यात असेही म्हटले आहे की, ‘किशोरी आमोणकर हे २० व्या शतकातील भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रमुख गायिकांपैकी एक आहेत.’

यामध्ये सन २०१० मध्ये आलेल्या ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्याचाही संदर्भ देत म्हटले की, “गाण्यांमध्ये बॉलिवूड चित्रपटातील संगीत, नृत्य आणि रंगीबेरंगी दृश्यांमधील अनेक वैशिष्ट्ये आहेत.” १० सप्टेंबर २०१० रोजी दबंग सिनेमा भारतात प्रदर्शित झाला होता. सलमान खान यात मुख्य भूमिकेत होता. या गाण्यात त्यावेळी ३७ वय असलेल्या मलायका अरोराने आयटम सॉंग केले होते. हे आयटम ,सॉंग म्हणजे मुन्नी बदनाम हुई. हे गाणे त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले होते.

अगदी मलायका अरोराला पुढे मुन्नी नावाने ओळखले जाऊ लागले होते. २०११मध्ये टी सिरीजने हे गाणे युट्यूबवर पब्लिश केले व आज या गाण्याला तब्बल १० कोटी हिट्स मिळाल्या आहेत.

डीएफईने म्हटलेे की, याचा मॉडेल संगीत अभ्यासक्रम १५ संगीत शिक्षण तज्ञ-शिक्षक आणि संगीतकारांच्या पॅनेलद्वारे विकसित केला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलियानंतर राम चरणचा ‘या’ चित्रपटातील लूक व्हायरल, मिळतोय जबरदस्त प्रतिसाद

-‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री पडली होती टीव्हीवर भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात, १६ व्या वर्षी निभावले होते सूनेचे पात्र

-चित्रपटात बेड सीन देताना शाहरुखने केलं ‘असं’ काही, काजोलसह सर्वजण झाले होते चकित

हे देखील वाचा