बॉलिवूडची दुनिया ही ग्लॅमरस म्हणून ओळखली जाते. यातील सर्व कलाकार कायमच बिनधास्त आणि सतत हसतमुख आयुष्य जगताना दिसतात. हे असे सतत हसतमुख आणि स्वछंद वावरताना बघून, यांच्या आयूष्यात काही वाईटही घडत असेल, याचा कोणालाच अंदाज बांधण कठीण आहे. माणूस हा माणूसच आहे, मग तो श्रीमंत असो की मध्यमवर्गीय. आयुष्यातील चढ- उतार हे कधीच कोणाला चुकलेले नाहीत. बॉलिवूड जगतातले काही कलाकारही या गोष्टीला चुकलेले नाहीत. अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमचेही डोळे भरून येतील. आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे वाईट काळाला सामोरे गेले आहेत, ज्यांनी आपल्या मुलांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहिला आहे.
कबीर बेदी
बॉलिवूड अभिनेता कबीर बेदीसुद्धा या वेदनेतून गेला आहे. त्याचा २६ वर्षीय मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली होती. वास्तविक, सिद्धार्थ अभ्यासाच्या वेळी नैराश्याचा बळी झाला होता. त्याच्या उपचारादरम्यान, त्याने काही अशी औषधे घेतली, त्या गोळ्यांमुळे त्याचे दुःख वाढण्यात भर पडली. जेव्हा त्याचे हृदय खूप दु: खी झाले, नैराश्य वाढले, तेव्हा त्याने आत्महत्या केली. आपल्या लहान मुलाला अशाप्रकारे स्वत: दूर जाताना पाहून कबीर बेदी अस्वस्थ झाले होते.
गोविंदा
बॉलिवूडचा ‘हीरो नंबर १’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा नेहमीच हसताना दिसतो. त्याने चित्रपटांमध्ये बरेचं नाव कमावले आहे. तसेच त्याचे कुटुंबही खूप आनंदी दिसत असते. तथापि, त्याच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा कुटुंबातील अनेक सदस्यांचा एकामागून एक मृत्यू होत होता. त्याचवेळी, त्याच्या पहिल्या मुलीचा मृत्यू ती केवळ ४ महिन्यांची असतानाच झाला होता. आपले पाहिले अपत्त्य हरपल्यामुळे गोविंदा खूप दुःखी झाला होता.
आमिर खान
बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खान आज आपली पत्नी आणि तिन्ही मुलांसह खूप आनंदी आहे. तथापि, आमिरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याने त्याचे एक मूल गमावले होते. आमिरची पत्नी गर्भवती होती, परंतु काही कारणास्तव तिचा गर्भपात झाला. आपल्या मुलाला पाहण्याची आस लावून बसलेल्या आमिरला मोठा धक्का बसला होता.
मेहमूद
फिल्मी जगातील दिग्गज अभिनेते मेहमूद आता या जगात नाहीत. पडद्यावर बर्याचदा लोकांना हसवणाऱ्या मेहमूद यांनाही आपला तरुण मुलगा मॅक अलीच्या मृत्यूचा धक्का बसला होता. जगाला निरोप दिल्याआधी मॅक अली संगीत क्षेत्रात जगात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत होता. वयाच्या 31 व्या वर्षी मॅकला हृदयविकाराचा झटका आला होता. यारों सब दुआ करो या अल्बममध्ये मॅक अली दिसला होता.
शेखर सुमन
शेखर सुमन बर्याचदा पडद्यावर हसतानाही दिसतो, पण आयुष्यातला एक काळ असा होता, जेव्हा त्याने आयुष्यातील सर्वात वाईट काळ पाहिला होता. शेखरने अलकाशी लग्न केले. त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालले होते, तेव्हा एके दिवशी त्यांना कळले की, त्याचा मोठा मुलगा आयुषला ह्रदयरोग आहे.
त्यावेळी शेखरकडे आपल्या मुलाचा उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, आणि वयाच्या 11 व्या वर्षी त्याचा मुलगा मरण पावला. शेखर आणि त्यांची पत्नी दोघेही यानंतर खचून गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-