Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड ‘छैया छैया’च्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत अन् रक्तस्त्राव होऊनही नाचत होती मलायकाला, स्वत: केला खुलासा

‘छैया छैया’च्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत अन् रक्तस्त्राव होऊनही नाचत होती मलायकाला, स्वत: केला खुलासा

बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). वयाच्या ४९व्या वर्षी देखील मलायकाचा जलवा कायम आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र मलायकाला खरी ओळख मिळाली ते तिच्या आणि शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘दिल से’ या चित्रपटातून.

‘दिल से’ या चित्रपटातील ‘छैया छैया’ या गाण्याने मलायका रातो रात स्टार बनली. या गाण्याने तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. या गाण्यानंतर मलायकाने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का, या गाण्याच्या शूटिंग दरम्यान मलायकाला दुखापत झाली होती. हे खुद्द मलायकाने सांगितलं होतं.

‘छैया छैया’ या गाण्याचं शूटिंग रेल्वेमध्ये झालं होतं. त्यामुळे तिला या गाण्यावर डान्स करताना फार अडचणी येत होत्या. तिने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले की, गाण्याचं शूटिंग सुरू असताना तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला होता.

मलायका अरोराने एका रियालटी शोमध्ये तिचा अनुभव सांगितला होता. तिने सांगितलं की, छैया छैया गाण्याच्या शूटिंग वेळी ती खूप वेळा पडली होती आणि वाऱ्यामुळे ती उजवीकडे डावीकडे जात होती. हे टाळण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांनी मलायकाला रेल्वेला बांधले. त्यांनी रेल्वेला आणि मलायकाच्या घागऱ्याला दोरी बांधली. जेणेकरून तिला संतुलन राखण्यासाठी मदत होईल. मलायकाने सांगितले की, जेव्हा तिने दोरी सोडली तेव्हा तिच्या कंबरेवर अनेक कट होते आणि तिला रक्तस्त्राव होत होता.

पुढे ती हे सुद्धा म्हणाली की, तिच्या अंगावरील कट पाहून सर्वजण घाबरले होते, मात्र शूटिंगदरम्यान तिच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांनतर ती बरी झाली.

हे गाणे ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले असून, गुलजार यांनी त्याचे बोल लिहिले आहेत. ‘छैया छैया’ व्यतिरिक्त मलायकाने ‘मुन्नी बदनाम’, ‘माही वे’ आणि ‘हॅलो’ सारख्या अनेक आयटम सॉंगमध्ये नृत्य केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा