Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड साठच्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी, तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे करिअर झाले होते बर्बाद

साठच्या दशकातील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निम्मी, तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे करिअर झाले होते बर्बाद

ही कहाणी आहे बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रीची, जी आग्रा सोडून मुंबईत आली होती. १९६० च्या दशकात तिला एक अभिनेत्री म्हणून भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. तिची आई एक उत्तम गायिका तसेच एक उत्तम अभिनेत्री होत्या. वहिदाम हे त्यांचे नाव होते. ती केवळ १० वर्षांची असताना, तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिला अबोटाबादमध्ये पाठवण्यात आलं. त्यांचे आजोबा खूप मोठे जमीनदार होते. सिनेमा जगतात तमात अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर आपले सिनेसृष्टीत आपले नाव कोरले, आपल्या स्वत:च्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. पण आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत त्या अभिनेत्रीबद्दल जिला ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आम्ही बोलत आहोत, 60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री नवाब बानो उर्फ ​​निम्मीबद्दल.

दिनांक १८ फेब्रुवारी, १९३३ रोजी आग्रामध्ये जन्मलेली अभिनेत्री निम्मीचे खरे नाव नवाब बानो होते, परंतु त्यांचे चित्रपटात नाव ठेवण्यात आले होते, ते निम्मी. हे नाव त्यांना सुपरस्टार राज कपूर यांनी दिले होते. तो काळ होता, जेव्हा निम्मी प्रसिद्ध अभिनेत्री होती, आणि दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटांत काम करून घेण्यासाठी रांगा लावायचे. पण निम्मीने नंतर एका चित्रपटातील व्यक्तिरेखा निवडण्यात चूक केली, तिच्या या एका चुकीमुळे तिच्या उत्तम कारकिर्दीला उतरती कळा लागली. आज आम्ही तुम्हाला निम्मी संबंधित काही किस्से सांगणार आहोत.

राज कपूरने त्यांच्या ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे निम्मीला पहिला ब्रेक दिला होता. यानंतर निम्मीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, आणि तिला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. निम्मी ही एक अशी अभिनेत्री होती, जिने तिच्यानुसार चित्रपट निवडले. दिग्दर्शक कित्येक दिवस तिच्या ‘हो’ ची प्रतीक्षा करत असे. निम्मीने खूप नाव कमावले, आणि त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ ही हेडलाईन प्रसिद्ध झाली. ते निम्मीसाठी होते, आणि त्यामागे एक किस्सा होता.

वास्तविक, ‘आन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लंडनमधील रियाल्टो थिएटरमध्ये हा कार्यक्रम सादर करण्यात आला. जिकडे आन चित्रपटाला सेवेज प्रिंसेस या नावाने प्रदर्शित केले गेले होते. प्रीमियरमध्ये मेहबूब खान, त्यांची पत्नी आणि निम्मी उपस्थित होते. या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये अनेक परदेशी कलाकार उपस्थित होते. त्या सेलिब्रिटींमध्ये एरल लेजली थॉमसन फ्लिनदेखील होते. एरलने त्याच्या विदेशी चालीरीतीनुसार पुढे जाताना, निम्मीच्या हाताला किस करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचवेळी अभिनेत्री दोन पावले मागे गेली. त्याचवेळी निम्मी म्हणाली, “मी एक हिंदुस्तानी मुलगी आहे, तू माझ्याबरोबर हे सर्व करू शकत नाहीस.” दुसर्‍याच दिवशी वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये निम्मीबद्दल लिहिले की, “द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया.”

सन १९६२ मध्ये ‘मेहबूब’ चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री शोधली जात होती. दिग्दर्शन हरनाम सिंग यांना चित्रपटातील मुख्य अभिनेत्री म्हणून निम्मीला कास्ट करायचे होते, आणि त्यांनी ही भूमिका निम्मीला ऑफर केली होती. पण निम्मीने मुख्य नायिकेची भूमिका घेण्यास नकार दिला होता. निम्मीला मुख्य अभिनेत्री आणि बिना रॉय यांना राजींदर कुमारच्या बहिणीच्या पात्रासाठी निवडले होते. पण निम्मीला असे वाटले की, नायिकेच्या व्यक्तिरेखेपेक्षा बहिणीचे पात्र अधिक चांगले आणि आवश्यक आहे. तिला फक्त असा विचार आला, आणि ती एका बहिणीची भूमिका साकारण्यावर ठाम राहिली.

दिग्दर्शक हरनाम सिंग यांनी खूप समजूत काढल्यावर पण, निम्मीने आपला हट्ट सोडला नाही, तेव्हा नाईलाजाने निम्मीला त्यांनी बहिणीचे पात्र दिले. तसेच मुख्य अभिनेत्रीसाठी साधनाची सही घेतली. हा चित्रपट रिलीझ झाला होता, आणि निम्मीचा विचार संपूर्ण उलट ठरला. हा चित्रपट हिट झाला, आणि साधना मुख्य अभिनेत्री म्हणून, वरची नायिका बनली. प्रेक्षकांना साधनाचे पात्र अधिक आवडले. बहिणीच्या भूमिकेतली निम्मीची कारकीर्द येथून खालावू लागली.

‘मेहबूब’ हा चित्रपट हिट ठरला, आणि साधना एका रात्रीत स्टार बनली, तर त्याचवेळी पुढच्या चित्रपटात निम्मीलाही या चुकीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतरचे अनेक हिट चित्रपट साधनांकडे गेले, आणि निम्मीकडे चित्रपट नव्हते. यापूर्वी, अभिनेत्री निम्मी ‘बरसात’, ‘दीदार’, ‘दाग’, ‘आन’, ‘उडन खटोला’, ‘बसंत बहार’, ‘कुंदन’ आणि ‘भाई-भाई’ यांसह अनेक मोठ्या चित्रपटांचा एक भाग होती. सन २०२० मध्ये २५ मार्च रोजी निम्मीने जगाला निरोप दिला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लखलखत्या बॉलिवूड दुनियेत ‘हे’ कलाकार पडले मागे, आपल्या वडिलांप्रमाणे होऊ शकले नाहीत यशस्वी

-सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडचे सर्वोत्तम २५ चित्रपट, तुम्हालाही पाडतील विचार करायला भाग, आमिर खानच्या २ चित्रपटांचा समावेश

-बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे झाली होती साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारतीची भेट; वाचा रहस्यमयी मृत्यू झालेल्या अभिनेत्रीची कहाणी

हे देखील वाचा