Monday, July 1, 2024

काय सांगता! बॉलीवूडच्या ‘या’ दिग्गज कलाकारांनी गाजवलेत पाकिस्तानी सिनेमे, तिथेही कमावलंय मोठ्ठं नाव

मुंबई ही मायानगरी असून इथे वेगवेगळ्या देशातून बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावायला लोक येत असतात. बॉलिवूड  क्षेत्र असे आहे कि, जिकडे रोजच काहीतरी नवीन घडत असते, काही कलाकार कमी वेळातच आपले नाव कमावतात, आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. याआधीसुद्धा भारतातूनच नवे तर पाकिस्तानमधून देखील अनेक कलाकारांनी आपली हजेरी बॉलिवूडमध्ये लावून, आपले नाव निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे काही भारतीय कलाकार देखील आहेत, ज्यांनी भारतातील छोट्या आणि मोठया पडद्यावर तर आपली ओळख निर्माण केलीच, परंतु पाकिस्तानमधल्या चित्रपटात, आणि अनेक टीव्ही कार्यक्रमातसुद्धा आपली उत्तम कामगिरी दाखवली आहे. आम्ही तुम्हाला त्या स्टार्सविषयी सांगू ज्यांनी पाकिस्तानातही आपली कला सादर केली आहे.

नसीरुद्दीन शाह-

बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी मनोरंजन जगात उत्तम काम केले. खुदा के लिए या पाकिस्तानी चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फवाद खान, शान आणि इमान अली या पाकिस्तानी कलाकारांचा समावेश होता.

किरण खेर-

बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या किरण खेर यांनीही पाकिस्तानच्या भूमीवर काम केले आहे. अनुपम खेर यांची पत्नी आणि भाजप खासदार किरण खेर यांनी ‘खामोश पानी’ या पाकिस्तानी चित्रपटात काम केले. हा चित्रपट २००३ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी किरण खेर यांना स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

जॉनी लीव्हर-

आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारा विनोदी अभिनेता जॉनी लीव्हर हादेखील पाकिस्तानी चित्रपटाचा एक भाग राहिला आहे. जॉनीने ‘लव्ह इन गम’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात पाकिस्तानी सुपरस्टार मोअम्मर राणा आणि रीना खान मुख्य भूमिकेत होते.

श्वेता तिवारी-

‘कसोटी जिंदगीकी’ या छोट्या पडद्यावरील फेमस अभिनेत्री श्वेता तिवारी ,हिने ज्याप्रमाणे भारतात आपल्या उत्तम कामगिरीची छबी दाखवली, त्याचप्रमाणे भारतासोबतच पाकिस्तानमध्येसुद्धा आपल्या उत्तम अभिनयाचा झेंडा रोवला. छोट्या पडद्याची प्रसिद्ध ही अभिनेत्री पाकिस्तानी चित्रपटाचा एक भाग राहिली आहे. तीने ‘सल्तनत’ या पाकिस्तानी चित्रपटात काम केले. जरी हा चित्रपट पडद्यावर काही खास कमाल दाखवू शकला नाही, परंतु लोकांना श्वेताचे काम आवडले. श्वेताच नाही तर बॉलिवूड स्टार आकाशदीप सहगल देखील या चित्रपटाचा एक भाग होता.

अमृता अरोरा-

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा यांनीही सीमापार पाकिस्तानी चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट म्हणजे ‘गॉडफादर’ चित्रपटाचा रीमेक. अमृताशिवाय हर्षिता भट्ट, प्रीती झांगानिया आणि किम शर्मादेखील या चित्रपटात दिसले होते. याशिवाय चित्रपट अभिनेता अरबाज खान देखील गॉडफादरच्या रिमेकचा भाग बनला होता.

सारा खान

छोट्या पडद्यावरील शो ‘सपना बाबुल का बिदाई’ ने घरातील नाव कमावणारी सारा खान देखील पाकिस्तानी शोचा एक भाग राहिली होती. साराने ‘ये कैसी मोहब्बत है’ या पाकिस्तानी कार्यक्रमात काम केले होते. या शोमध्ये त्यांच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता नूर हसन देखील दिसला होता.

हे देखील वाचा