Saturday, June 29, 2024

‘कोई… मिल गया’ मधील बालकलाकार आता बनलीय प्रसिद्ध अभिनेत्री, सौंदर्य पाहून जाल भुरळून

नव्वदच्या दशकात गाजलेले काही चित्रपट, त्यातील गाणे त्यातील कलाकारांचे अभिनय हे सगळं आपल्याला आठवतच असेल. कारण ते चित्रपट आणि त्यातील कथा ही कायमच लक्षात राहण्यासारखे आहेत. मात्र त्यातील बालकलाकार सुद्धा अभिनयात कधीच मागे नव्हते. त्यांनी देखील त्या काळातल्या कलाकरांच्या खांद्याला खांदा लावत, आपला अभिनय पार पाडला. त्यातल्याच एका बालकलाकार बदल आपण या लेखनातून जाणून घेणार आहोत.

‘कोई… मिल गया’ हा चित्रपट सर्वांच्याच लक्षात राहण्यासारखा आहे. कारण या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) या दोघांनी मुख्य भूमिका साकारल्या. मात्र, यांच्यासोबत एक बालकार देखील होती जिने टीना ही व्यक्तिरेखा साकरली होती.

टीनाचं खरं नाव हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आहे, आणि आता हीच टीना मोठी झाली असून ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हंसिकाने बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरवात केली.

 

हंसिकाचा जन्म ९ ऑगस्ट १९९१ साली झाली. तिने तिच्या करिअरची सुरवात बालकलाकार म्हणून ‘शका लका बूम-बूम’ या मनोरंजन मालिकेतून केली. त्यानंतर तिने अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यासोबत ‘कोई…मिल गया’ या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

हंसिकाने वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी तामिळ चित्रपटात काम करायला सुरुवात केली. नंतर ती हिमेश रेशमियाच्या (Himesh Reshamiya) ‘आपका सुरूर’ या चित्रपटातही दिसली. ज्यामुळे तो लोकप्रिय झाला. यानंतर तिने २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘देसामुदुरू’ या तेलगू चित्रपटामधून पदार्पण केलं. नंतर २००८ साली आलेल्या ‘कांतारी’ आणि २००९ साली आलेल्या ‘मस्का’ या लोकप्रिय तेलगू चित्रपटामध्ये काम केले.

हंसिकाने तामिळमध्ये अनेक यशस्वी चित्रपटही दिले आहेत, ज्यामध्ये ‘एंग्यम कधाल, आणि ‘वेलायुधम’, हे दोन २०११ साली प्रदर्शित झाले तर ‘ओरू काल ओरू कनादी (२०१२)’, आणि ‘सिंघम २ (२०१३)’ यामध्ये सुद्धा दिसली. तिच्या आगामी चित्रपटाबदल बोलायचं झालं, तर तिचे पाच प्रकल्प रांगेत आहेत जे तामिळ आणि तेलगू भाषेतील आहे.

 

हे देखील वाचा