बॉलिवूडमधील अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याची वैयक्तिक आयुष्य नेहमीच लाईमलाईटपासून वेगळी ठेवतो. वरुण आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) या जोडीने लग्नाआधी त्यांच्या रिलेशनवर जास्त चर्चा केल्या नाहीत, पण लग्नानंतर क्वालिटी टाईम सोबत घालताना खूपवेळा दिसले आहे. वरुण आणि नताशा दलाल नेहमी सोबत दिसत होते. हे जोडपे सोबत घालवलेल्या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अनेक चाहत्यांना हे माहिती नसेल, परंतु नताशा दलाल पहिल्यापासूनच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. आता तिच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, आता नताशा ओटीटीवर प्रवेश करणार आहे.
फॅशन डिझायनिंग शोमध्ये दिसणार नताशा
नताशा दलाल फॅशन डिझायनिंगशी निगडीत असलेल्या एका शोमध्ये दिसणार आहे. या शोचे नाव ‘टू द ड्रेस इंडिया’ आहे. हा शो पूर्णपणे एक फॅशनवर आधारित असणार आहे. या शोच्या माध्यमातून ती नवरीचे पोशाख डिझाईन करता दिसेल. यासोबतच पहिल्यांदाच नताशा या शोमधून तिचे वेडिंग कलेक्शन्स दाखवताना दिसणार आहे. हा शो डिस्कवरी प्लस (Discovery Plus) या चॅनेलवर दिसणार आहे.
एका मुलाखतीमध्ये नताशा दलालने बोलताना सांगितले की, “डिझायनिंग नेहमी माझ्या आवडीचे राहिले आहे. तसेच ओटीटीमध्ये पदार्पण करण्याचा चांगली संधी आहे आणि मला अजून काय हवं. पूर्ण जगात टू द ड्रेस हा शो खूप प्रसिद्ध आहे. आणि हा शो भारतात होण्याचा एक भव्य अनुभव आहे. एका नवरीचे ड्रीम आऊटफिट डिझाईन करण्याचं काम करायला मिळणे हे माझ्यासाठी एका सन्मानाची गोष्ट असणार आहे. या शोमध्ये सहभाग घेण्यासाठी खूप उत्साहित आहे.”
कशी झाली वरुण आणि नताशामध्ये मैत्री
वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाची चर्चा 2020 पासून पाहायला मिळाली. जानेवारी 2021 मध्ये या जोडप्याने लग्न केले. यांच्या लग्नामध्ये खूप कमी लोक उपस्थित होते. बॉलिवूडचे काही कलाकार या लग्नात सहभागी झाले होते. वरुण आणि नताशा हे दोघं बालमित्र होते. यासोबत त्यांनी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
-रणबीर कपूरचा आकर्षक फोटो शेअर करत, अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनाबाबत दिले संकेत