बॉलिवूडमध्ये चित्रपटांना जशी सुरवात झाली, तशीच सुरवात त्या काही चित्रपटांमध्ये असणाऱ्या अभिनेता तसेच अभिनेत्री यांच्या प्रेमप्रकरणांना झाली. आणि मग बघता बघता, चित्रपटांचे जसे नावं होऊ लागले, तशीच चर्चा यांच्या प्रेमप्रकरणांची होऊ लागली. बॉलिवूडची अशी अनेक जोडपी आहेत, जे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली दिसतात, त्यावेळी त्यांना जगाचे भानही असताना दिसत नाही. या प्रेमात बुडालेल्या जोडप्यांसाठी रोजच व्हॅलेंटाईन्स डे असतो. बॉलिवूडमध्ये जरी अनेक लव्हबर्ड्स आहेत, पण अशा काही जोडप्यांविषयी तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्हाला वाचायला नक्की आवडेल, ज्यांना चाहत्यांनाही एकत्र बघायला आवडतं.
मलायका अरोरा- अर्जुन कपूर
बॉलिवूड कलाकार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या बातम्यांची सगळेकडे बरीच चर्चा आहे. येत्या काही दिवसात त्यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. वर्ष २०१९ मध्ये त्यांच्या लग्नाच्या तारखेविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. जरी त्यांचे लग्नाबद्दलचे मत स्पष्ट झालेले नाही, परंतु बर्याच प्रसंगी ते दोघेही एकमेकांवर उघडपणे प्रेम करताना दिसले आहेत.
दीपिका पदुकोण- रणवीर सिंग
कधी प्रेक्षकांची मने जिंकणारी मस्तानी-बाजीराव तर कधी राम-लीला, दीपिका रणवीरसुद्धा एकमेकांच्या प्रेमात बुडलेल्या दिसतात. दीपिका आणि रणबीरने ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले. लग्नाआधी आणि लग्नानंतरही हे जोडपे नेहमीच एकमेकांवर प्रेम करताना दिसले आहेत.
रणबीर कपूर- आलिया भट्ट
चॉकलेट बॉय रणबीर कपूर याचे नाव बॉलिवूडच्या अनेक सुंदर अभिनेत्रींशी जोडले गेले आहे.परंतु तो आलियाच्या जवळ आल्यामुळे त्यांचे जग बदलले आहे असे दिसते. त्याचवेळी आलिया बर्याच वेळा रणबीरवर आपले प्रेम व्यक्त करतानाही दिसली आहे. अवॉर्ड शो आणि कॅमेऱ्यासमोर दोघेही बर्याचदा एकमेकांच्या नजरेत हरवलेले कैद झाले आहेत.
अनुष्का शर्मा- विराट कोहली
विरुष्का म्हणून ओळखले जाणारे हे बॉलिवूड क्रिकेट जोडपे एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसतात. या दोघांच्या डेटिंगपासून ते त्यांचे लग्न आणि त्यानंतरचे आयुष्य हे एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा कमी वाटत नाही. लग्नाआधी किंवा लग्नानंतर हे सुंदर जोडपे नेहमीच मिठी मारताना, आणि एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले आहे.
सध्या त्यांच्या घराबाहेरील वामीका,अनुष्का, विराट या फॅमिली टॅगची खूप चर्चा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-