‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर दर आठवड्यास कोण ना कोण पाहुणे येत असतात. त्या पाहुण्यांसोबत बोलतात आणि अन्य कलाकारांना पोट धरून हसवतात आणि त्यांचे मनोरंजनही करतात. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये सलमान खान (Salman Khan) आपला नवीन चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ (Antim: The Final Truth) हा चित्रपट प्रमोशन करण्यासाठी आले होते. या शोमध्ये सलमान खानचा एका प्रेक्षकासोबत संवाद साधतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
‘द कपिल शर्मा शो’ पाहायला आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो सूरतवरून आला असून तो छोटा- मोठा कलाकार आहे. त्याने असे म्हणताच, सलमान खान म्हणाला की, “कोणताही अभिनेता किंवा कलाकार हा छोटा नसतो. शाहरुख खानच्या त्या चित्रपटातील डायलॉग माहिती आहे ना?”
सलमान खानने पुन्हा एकदा जिंकले प्रेक्षकांचे मन
यावर तो व्यक्ती सलमान खानचे कौतुक करताना म्हणतो की, “मी फक्त भाईला ओळखतो. हिंदुस्थानचा भाई, हिंदुस्तानचा एकच भाई आहे सर.” त्या व्यक्तीचा इशारा सलमान खानकडे होता. शाहरुख खानबद्दल असे ऐकून त्याला कदाचित आवडले नाही. त्यामुळे सलमानने जे उत्तर दिले, ते उत्तर ऐकून चाहते कौतुक करत आहेत.
सलमान खान का झाला गंभीर?
“परंतु शाहरुख खान हा माझा भाऊ आहे. तुमच्या भावाचा भाऊ कोण लागणार?” असे सलमान पुढे म्हणाला. यावर तो व्यक्ती म्हणाला, “आपला पण भाऊ.” यावर सलमान खान अत्यंत गंभीरपणे म्हणाला की, हे तुझ्या डोक्यात राहूदे. ज्याप्रकारे सलमान खानने उत्तर दिले, त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले.
सलमान खान काही दिवसांपासून त्याचा नवीन चित्रपट ‘अंतिम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगली कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्मा हा देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर टीव्ही शोमधून कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री महिमा मकवानाने या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉट कपल असणाऱ्या कॅटरिना आणि विक्की यांच्यामध्ये ‘बार्बी डॉल’ आहे कमाईच्याबाबतीत सर्वात पुढे