Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘देवों के देव महादेव’ मधील पार्वती अवतरली बोल्ड अंदाजात, बाथ टॅबमधील हॉट फोटो आले समोर

अभिनेत्री पूजा बॅनर्जीही ‘देवों के देव महादेव’ या हिंदी मालिकेत पार्वतीची व्यक्तिरेखा साकारते. सध्याच पूजा बॅनर्जीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून बाथ टबमधला तिचा फोटो अपलोड केला आहे. बाथटबमध्ये ती झोपलेली दिसून येते हा तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज तिच्या फोटोमधून दिसून येत आहे.

पूजा बॅनर्जी मालिकेमध्ये एवढी साधी सरळ दिसत आहे. परंतु खऱ्या आयुष्यात ती बोल्ड आणि ब्युटीफूल आहे. पूजा बॅनर्जी ‘देवो के देव महादेव’ या हिंदी मालिकेत पार्वतीची व्यक्तिरेखा साकारते. ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. अशातच तिने तिचे हे बोल्ड फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना अवाक केले आहे.

पार्वती व्यक्तिरेखा साकारणारी पूजा बॅनर्जी अशा अंदाजात चाहत्यांसमोर येऊन त्यांना थक्क करत आहे. फोटोमध्ये आपण बघू शकतो की, ती तिच्या ड्रेसमुळे खूप हॉट अंदाजात दिसत आहे. राऊंड हॅट आणि ब्लू कलरचा चष्मा यामधील तिचा फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहींना हा अंदाज आवडला काहींना ही गोष्ट फार खटकली आहे.

काही चाहत्यांनी कमेंट मध्ये लिहिले आहे की,  “तुम्ही असं का करता? ” तर काहींनी तिला प्रोत्साहित करत ” खूप सुंदर मॅम, ” अशी कमेंट केली आहे. तिने हा फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन लिहिले आहे की, “रंगाच्या प्रेमात!” हॉट अंदाजतील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. फोटो खाली चाहत्यांनी आपापली प्रतिक्रिया देत मत व्यक्त केली आहेत.

हे देखील वाचा