बाप्पाच्या दर्शनासाठी ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी लावली थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी हजेरी, पाहा फोटो

0
222

देशभरात सध्या गणपती बप्पाच्या आगमनापासुन ते विसर्जनापर्यत सळीकडे जल्लोष पाहायला मिळत आहे. सगळ्यात जास्त हा जल्लोष हा महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. यामध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बप्पाचे अगमन झाले हेते. आज बप्पाचे विसर्जन असल्याने शिंदे घराण्याच्या बप्पाचे दर्शन घेण्यासाठी काही सेलिब्रीटींनी हजेरी लावली होती, जाणुन घेउया कोण होते ते सेलिब्रिटी.

गणेशोत्सवाच्या जल्लोष सगळीकडेच सुरु आहे. असाच जल्लेष आपल्याला मुख्यामंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या घरी देखिल पहायला मिळत आहे. आज विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्याने शिंदे घराण्याच्या बप्पाचे दर्शन घेण्यासाठी थेट बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत ते म्हणजे रणवीर सिंग(Ranvir Singh), दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आणि सारा अली खान(Sara Ali Khan) हे शिंदेच्या घरी पोहोचले आहेत.

या खास दिवशी रणवीर सिंगने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजाम्यामध्ये दिसला आणि दिपीकाने लाल आणि
हिरव्या रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेस पिधान केला होता. सारा अली खान हीने पिवळ्या रंगाचा सिंपल पटियाला ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.


शिंदे घरातील आयोजित गणेशोत्सव मध्ये या सेलिब्रीटीनी हजेरी लावल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या आधी रणवीर आणि दिपीका अंबानी कुटुंबातील गणपती विसर्जनाला पोहोचले होते, आज विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्याने या दोघांनी ही संधी देखिल सोडली नाही आणि दर्शनासाठी शिंदे कुटुंबातही पोहोचले.

दिपीका पादुकोनच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, तीच्याकडे दोन तीन प्रोजेक्ट आहेत. ती लवकरच अभिनेते अमिताभ बच्चन आणि प्रभास यांच्या सोबत चित्रपट ‘प्रोजेक्ट के मध्ये’ पहायला मिळनार आहे. दिपीका आणि ऋतिक रोशन हे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याव्यतीरिक्त ती शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटात देखिल काम करणार आहे आणि अमिताभ बच्चन सोबत आणखी एका चित्रपटात दिसणार आहे जो ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणर आहे.

रणवीर सिंग हा करण जोहरने दिग्दर्शित केलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्याच्या सोबत आलिया भट्ट विरुद्ध बाजूने असणार आहे. याशिवाय रोहीत शेट्टीच्या चित्रपट सर्कसमध्ये देखिल काम करणार आहे या चित्रपटात रणवीर सोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पुजा हेगडे पहायला मिळणार आहे.

सारा अली खान बद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच गैसलाइट या चित्रपटामध्ये दिणार आहे, सारा सोबत विक्रांत मैसी आणि चित्रांग सिंह हे देखिल कलाकार पहायला मिळणार आहेत. तिने नुकतेच एका अनटायटल चित्रपटाचे शूटिंग पुर्ण केले आहे. या चित्रपटामध्ये तिच्या विरुद्ध विकी कौशल असणार आहे. तिने यापूर्वी अक्षय कुमार आणि धनुष सोबत चित्रपट ‘अतरंगीरे’ यामध्ये काम केले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
एँजेलिना जोलीचा एक्स पतीवर मोठा आरोप! 250 मिलियन डॉलर्सच्या खटल्यात आमने-सामने
बाप्पांच्या दर्शनासाठी बॉलिवूड कलाकार ‘वर्षा’ वर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी साधला संवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here