Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन आनंदाची बातमी! ‘या’ अभिनेत्रीला मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, फोटो शेअर करत हटके अंदाजात केले सेलिब्रेशन

आनंदाची बातमी! ‘या’ अभिनेत्रीला मिळाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’, फोटो शेअर करत हटके अंदाजात केले सेलिब्रेशन

टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिस तिच्या कसदार अभिनयाने चांगलीच प्रसिद्ध आहे. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिकेतील तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. सध्या एरिका तिला मिळालेल्या ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’मुळे खूपच आनंदी दिसत आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ती या सुंदर क्षणाचे केक कापून सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

अभिनेत्री एरिका फर्नांडिस (Erica Fernandes) ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. मालिकेतील तिच्या सहजसुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तिच्या सोनाक्षीच्या भूमिकेला लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. याच यशामुळे आणि भूमिकेमुळे तिला सर्वोत्कृष्ट टीव्ही अभिनेत्री म्हणून ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

या बातमीने आनंदी झालेल्या एरिकाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुटुंबाचे, चाहत्यांचे, मित्रांचे आभार मानले आणि आपला आनंद व्यक्त केला आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एरिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आपल्या मित्रांसोबत आणि चाहत्यांसोबत केक कापताना दिसत आहे.

यावेळी आपला आनंद व्यक्त करताना ती लिहिते की, “मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. सोनाक्षीच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी तन- मन लावून काम केले. यामध्ये मला दिग्दर्शक आणि सहकलाकारांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. मला लहानपणी कुणीतरी सांगितले होते की, तुला एकदिवस मोठ्या मंचावर काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणीही तुम्हाला बिघडवू किंवा घडवू शकत नाही, सगळे काही तुमच्या हातात आहे. तुम्ही जसे काम कराल तसेच तुम्ही घडत असता.”

यावेळी पुढे बोलताना एरिका म्हणते की, “एका भीतीतून सुरू झालेला हा प्रवास आनंदाने संपला. सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे माझ्या भोवतीच्या सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र-परिवार, चाहते सगळेच याबद्दल उत्सुक होते. या सर्वांची मी आभारी आहे. त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमळ मला मिळाले.”

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

या पुरस्कार वितरण सोहळ्यातसुद्धा एरिकाच्या मनमोहक लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ सोबत ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतसुद्धा एरिकाने भूमिका साकारली आहे.

हेही पाहा-

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा