दिग्दर्शक सचिन सराफ लवकरच त्याचा पहिला सिनेमा बनवणार आह. त्यांनी याआधी दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. आता सचिन त्यांचा पहिला सिनेमा तयार करणार आहे. या पहिल्या सिनेमात त्यांनी अभिनेत्री ईशा देओलला घ्यायचे ठरवले आहे. लग्नानंतर अभिनयापासून लांब गेलेल्या ईशाने काही दिवसांपूर्वीच आलेल्या ‘रुद्र’ या सीरिजमधून पुन्हा एकदा अभिनयाचा श्रीगणेशा केला. आता ती पुन्हा एकदा चित्रपटात दिसण्यासाठी सज्ज झाली आहे.
बऱ्याच मोठा काळानंतर चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या ईशाने सांगितले की, “या सिनेमातील माझिया भूमिका आयुष्यातील महिलांचा विकास दाखवणारी आहे. ही एक मोठा, मजबूत आणि साधा संदेश देते की, एक स्त्री आयुष्यात सर्व काही मिळवू शकते. माझी भूमिका अशी आहे जी, आयुष्यात काहीतरी शोधते आणि मोठे काहीतरी करून दाखवते.” या सिनेमात ईशासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे अभिनेता अमित साथ. अमितबद्दल बोलताना ईशा म्हणाली, “अमित हिंदी चित्रपटांमधील आजच्या पिढीच्या कलाकारांमधील एक उत्तम अभिनेता आहे. मी अजय देवगणसोबत ‘रुद्र’मध्ये काम केले. सुनील शेट्टीसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. आता मी या दोघांसोबत काम करत असल्यामुळे खूप सामान्य आणि सहज झाली आहे. आता अमितसोबत काम करण्याचा अनुभव काहीतरी नवीन देऊन जाईल.”
View this post on Instagram
सचिन सराफ यांच्या या नवीन सिनेमात ईशा आणि अमितसोबत तिग्मांशु धूलिया, सीमा बिस्वास, मिलिंद गुणाजी आदी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अमित एका एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची भूमिका निभवानर असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी सचिन सराफ यांनी बराच कला अनिल शर्मा यांच्यासोबत सहायक म्हणून काम केले आहे. अनिल यांनी देओल परिवारासोबत जास्त काम केले आहे. दरम्यान ईशाने धूम, जस्ट मॅरीड, नो एन्ट्री आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. आता तिच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये तिला नक्कीच यश मिळेल असा विश्वास तिच्या फॅन्सला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ