Saturday, July 6, 2024

कॅमेऱ्यासमोरच रोमँटिक मूडमध्ये आली ईशा गुप्ता, लिपलॉक फोटो व्हायरल

बॉलिवूडची सुपरबोल्ड गर्ल ईशा गुप्ता (Esha Gupta) सतत तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. चाहतेही अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच ईशाने नवीन वर्षाचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस ग्वालरसोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये ईशा बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक करताना दिसली.

लिपलॉक करताना दिसली अभिनेत्री
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ईशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२२ तुमचे आणि माझे.” या पोस्टसोबत अभिनेत्रीने आणखी काहो फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये ईशा लिपलॉक करताना दिसत आहे. (esha gupta crocess all limits in new year 2022 shared liplock picture with boy friend)

घातला हॉट ड्रेस
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये ईशाने तपकिरी रंगाचा स्टेप गाऊन परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ईशाचा क्लीवेज स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्‍ये ईशाचा बोल्ड आणि हॉट लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. फोटोंमध्ये ईशा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पोस ग्वालरसोबत खूप आनंदी दिसत आहे. एका फोटोमध्ये ईशा आणि मॅन्युएल हातात ग्लास घेऊन दिसले आहेत. ज्यामध्ये दोघेही हसताना पोझ देत आहेत.

आगामी वेबसीरिज
ईशा गुप्ता ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. यामध्ये ईशा बॉबी देओलच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारणार आहे. ‘आश्रम’ वेब सीरिजचे दोन्ही भाग हिट ठरले, त्यानंतर प्रेक्षक आता याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा