हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच नेहमी चर्चेत असतात. या अभिनेत्रींमध्ये ईशा गुप्ताचे (Esha Gupta) नाव पहिल्यांदा घेतले जाते. आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे इशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये बोल्डनेसचा तडका पाहायला मिळतो ज्यावर नेटकरी मोहित होताना दिसत असतात. सध्या सुट्टीची मजा घेत असलेल्या इशा गुप्ताच्या अशाच बोल्डलूकने नेटकऱ्यांना चांगलेच घायाळ केले आहे. कोणती आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ.
अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेचा विषय ठरते आणि हीच गोष्ट कायम ठेवत तिने इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगवली आहे. ईशा गुप्ताचा लेटेस्ट बिकिनी व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिच्या बोल्डनेसवर फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या तिच्या प्रोजेक्ट्स आणि प्रमोशनपासून मुक्त झालेली ईशा गुप्ता सुट्टीवर गेली आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉलिडे एन्जॉय करत असल्याचं बोललं जात आहे. अधिकृत इंस्टाग्रामवर, ईशा गुप्ताने बिकिनीमधील एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तपकिरी रंगाच्या टू पीसमध्ये दिसत आहे.
या बोल्ड व्हिडिओमध्ये ती बीचवर मस्ती करताना आणि फ्लॉंट करताना दिसत आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ईशा गुप्ता समुद्रकिनारी फिरताना आणि तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना खूपच आकर्षक दिसत आहे. ईशा गुप्ताचा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सनी लगेच प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी ईशा गुप्ताच्या फिगरचे कौतुक केले तर काहींनी तिचे व्यक्तिमत्त्व जबरदस्त असल्याचे सांगितले आहे. सध्या इशाच्या या व्हिडिओचीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
दरम्यान आपल्या बोल्डलूकमुळे चर्चेत येण्याची इशाची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा इशाने तिच्या बोल्डलूकमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. नुकतीच इशा आश्रम ३ या वेबसिरीजमध्ये झळकली होती. ज्यामधील तिच्या बोल्डसीनने सर्वांना थक्क केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- ‘बंदूक बाळगणं फ्री, पण बाळ…’, ‘गर्भपात बेकायदेशीर’ प्रकरणावर प्रियांका चोप्राची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
- हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड बनली जगातील सर्वात सुंदर महिला, वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे केले सिद्ध
- Om | प्रमोशनवेळी थेट ‘द ग्रेट खली’शी भिडला आदित्य रॉय कपूर, मात्र पुढं जे झालं ते पाहून धराल डोकं










