Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बोल्डनेसने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटाइतक्याच सोशल मीडियावरील बोल्ड आणि बिंधास्त फोटो पोस्टमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ताचे (Isha Gupta) नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ईशा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या ईशाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिच्या बोल्ड अदांवर नेटकरी फिदा झालेले दिसत आहेत.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक ईशा गुप्ता नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सध्या पुन्हा एकदा ईशा गुप्ता तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची अतिशय ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामधील तिचा बोल्ड लूक पाहून चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ईशाने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती वेगवेगळे कपडे घालून आरशासमोर चालताना दिसत आहे.

यादरम्यान ती कधी ब्रेलेस बाहेर येत आहे, तर कधी बिकिनीमध्ये तिचा मनमोहक अंदाज दाखवत आहे. एकूणच वेगवेगळ्या बोल्ड ड्रेसेसमध्ये ती तिची हॉट आणि ग्लॅमरस स्टाईल दाखवत आहे. ईशाने हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ईशाच्या या बोल्ड अदांवर तिच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. खऱ्या आयुष्यापासून ते चित्रपटांपर्यंत ईशा नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलने चर्चेत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आश्रम 3’ या वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत तिची किलर स्टाइलही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा