Saturday, June 29, 2024

हॉटनेसने तरुणांची झोप उडवणाऱ्या अभिनेत्री ईशा गुप्ताने लग्नाबद्दल केला मोठा खुलासा, असा आहे प्लॅन

ईशा गुप्ता (Isha Gupta) ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि हॉट लूकने तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाईतकीच ती सोशल मिडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या बोल्ड फोटोंनी ती सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधत असते. नुकताच ईशा गुप्ताने तिच्या लग्नाबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री ईशा गुप्ता हॉटनेसच्या बाबतीत अनेक सौंदर्यवतींना मागे टाकते. ईशाने ‘आश्रम 3’ मध्ये अभिनेता बॉबी देओलसोबत बोल्ड सीन देऊन चांगलीच चर्चेत आली होती. या सिरीजमधील सोनियाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तेव्हापासून ईशाने कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केला तर तो व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर ईशा गुप्ताचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. ईशा गुप्ताचे हे शब्द ऐकून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.

व्हायरल भयानी यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टा हँडलवरून शेअर केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ईशा गुप्ता रस्त्यावर तिच्या कारची वाट पाहताना दिसत आहे तेव्हा फोटोग्राफर तिच्याकडे येतात आणि ईशा पापाराझींची मजा करण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. यावेळी कॅमेरेवाले त्यांच्या मित्राबद्दल, “त्याला लग्न करायचे नाही,” असे सांगतात तेव्हा “ईशा त्यांना बिचारे लग्न का करतात? मी लग्नही करणार नाही. लग्नाची गरज काय?” असे म्हणताना दिसत आहे. ईशा त्या व्यक्तीला सांगते की तु लग्न करू नकोस. ईशाच्या लग्नाचा हा प्लॅन ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले आणि कमेंट करून तिला प्रश्न विचारू लागले आहेत. एका चाहत्याने “कधी लग्न करू” असे विचारले आहे तर दुसऱ्याने “मी ऐकले आहे की तुझा बॉयफ्रेंड आहे, मग तू त्याच्याशी लग्न करणार नाहीस का?” असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान अभिनेत्री ईशा गुप्ताने आश्रम वेबसिरीजमध्ये आपल्या बोल्डनेसचा तडका लावलेला आहे. यामधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेतील हा तिसरा अध्याय होता आणि आता चौथा अध्यायही येणार आहे. यात बॉबी देओल, अदिती पोहनकर, ईशा गुप्ता, दर्शन कुमार, चंदन कुमार सन्याल, त्रिधा चौधरी आणि इतर प्रमुख भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा