Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

तारक मेहता का उलटा चष्मा आणि साराभाई वर्सेस साराभाई एकत्र आले तर?

तारक मेहता का उलटा चष्मा आणि साराभाई वर्सेस साराभाई हे दोन्ही कार्यक्रम अक्षरशः प्रसिद्धीच्या पलीकडे गेले आहेत. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोराभ पंतच्या युट्यूब पॉडकास्टवर दिलीप जोशी आणि सुमित राघवन यांनी या दोन्ही कार्यक्रमाच्या एकत्र येण्याच्या कल्पेनेविषयी भाष्य केले.

सुमित म्हणाला, “हे लोकांच्या मनाला भिडेल. काय कल्पना आहे! साराभाईंच्या घरात जेठा आला पाहिजे. किंवा गोकुलधाममध्ये थोडा बदल होऊ शकतो. दया बापूजींसोबत नाचताना दिसू शकेल.”

दिलीप म्हणाला, “मला क्रॉसओव्हर करायला आवडेल. मला शक्य असेल तेव्हा सुमितबरोबर काम करायला आवडेल. तो एक अद्भुत सहकारी कलाकार आहे आणि आपल्याला खरोखरच आपले सर्वोत्तम द्यायला भाग पाडतो. तो काय करणार आहे हे आपल्याला माहित नसतं. आम्ही नाटकात एकत्र काम केलं तेव्हा स्वतः खूप हसायचो. तो स्टेजवर बऱ्याचदा आपसूक काहीतरी करायचा. मला त्याच्याबरोबर काम करायला खरोखर आनंद मिळतो. त्याच्याबरोबर ‘शुभ मंगल सावधान’, ‘भगवान बचाये इंको’ आणि नाटकांमध्ये काम करायला मजा आली.”

सुमितने असेही म्हटले आहे की तो पूर्वी तारक मेहताचा एक भाग होता. “आम्ही एकत्रीकरण केले होतो. ‘बडी दूर से आए हैं’ या शोसाठी ते केले होते. ”

तारक मेहताच्या चित्रीकरणाला लागणारा वेळ आणि कष्ट याबद्दल देखील दिलीपने भाष्य केले. तो म्हणाला, “जर तुम्ही साध्या गणिताचे काम केले तर महिन्यात २० भाग असतात आणि एक भाग शूट करण्यासाठी दीड दिवस लागतो. तर आपल्याला २० भाग मिळवायचे असल्यास, साहजिकच आपल्याला ३० दिवसांचे चित्रीकरण करावे लागेल. जर आपण एखाद्या दृश्यामध्ये आवश्यक नसल्यासच आपल्याला सुट्टी मिळेल. शिवाय लेखक किती लिहितील? ते ४-५ दिवस अगोदर लिहित आहेत असे नाही. आम्हाला दुसर्‍या दिवशी काय करायचंय ते आदल्या रात्री कळतं. म्हणून आपण आधीपासूनच कोणतीही योजना आखू शकत नाही. आपल्याला इतर सर्व काही विसरून शोवर लक्ष केंद्रित करावे लागते. आपण इतर सर्व गोष्टींपासून संन्यास घेतल्यासारखे आहे. मला ३-४ महिने अगोदर सुट्टीची योजना तर नाही करता येत. त्यावेळी शूटिंगची परिस्थिती काय असेल हे आपल्याला माहिती नाही. ”

हे देखील वाचा