Monday, June 9, 2025
Home अन्य जेव्हा उर्फी जावेदला मित्राच्या घरी जाऊन ड्रेस चेंज करणे पडले होते महागात; घरमालकाने…

जेव्हा उर्फी जावेदला मित्राच्या घरी जाऊन ड्रेस चेंज करणे पडले होते महागात; घरमालकाने…

कलाकार मोठ्या पडद्यावरील असो किंवा छोट्या पडद्यावरील, त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगल्या- वाईट अनुभवांचा सामना केलेला असतो. हे अनुभव ते अनेकदा उघडपणे माध्यमांपुढे सांगताना दिसतात. या कलाकारांमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ची माजी स्पर्धक उर्फी जावेदच्याही नावाचा उल्लेख होतो. उर्फी ही नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या विचित्र ड्रेसिंग सेन्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. कधी ती आपल्या पँटच्या उघड्या बटणामुळे, तर कधी मोज्यांपासून बनलेल्या क्रॉप टॉपमुळे सध्या चर्चेत आहे. बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर राडा करणाऱ्या उर्फीने आपल्या ऑडिशनच्या काळातील अनुभव सांगितला आहे.

माध्यमांशी बोलताना उर्फीने आपल्या ऑडिशनच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ती म्हणाली की, “जेव्हा मला ड्रेस चेंज करून दुसऱ्या ऑडिशनसाठी जावे लागायचे, तेव्हा मी तिथे जवळपासच्या रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये चेंज करण्यासाठी जायचे. एकदा तर झाले असे की, मी कुठून तरी सलवार सूट परिधान करून ऑडिशन देऊन आले होते. तसेच दुसऱ्या ऑडिशनला मला शॉर्ट ड्रेस परिधान करायचा होता. मी वॉशरूममध्ये चेंज करून जेव्हा शॉर्ट्समध्ये निधाले, तेव्हा लोक माझ्याकडे विचित्र पद्धतीने पाहू लागले होते.” (Ex Bigg Boss Contestant Urfi Javed Shares Her Audition Changing Room Experience)

याव्यतिरिक्त उर्फीने सांगितले की, “अनेकदा मी आपल्या मित्राच्या घरी जाऊन ड्रेस बदलत होते. एकदा यामुळेच वाद झाला होता. मी सलवार परिधान करून मित्राच्या घरी जायचे आणि वेस्टर्न ड्रेसमध्ये बाहेर पडायचे. त्यावेळी शेजाऱ्यांनी माझ्या मित्राच्या घरमालकाकडे याबाबत तक्रार केली होती. यानंतर माझ्या मित्राने भीतीने मला मदत करणे बंद केले होते.”

नुकतेच उर्फी आपल्या जीन्स पँटमुळे ट्रोल झाली होती. तिने जी पँट परिधान केली होती, त्याचे बटण उघडे होते. यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. एका युजरने म्हटले होते की, “ही कोणती फॅशन आहे की, जीन्सचे बटण उघडे आहेत?” यानंतर ती मोज्यांपासून बनलेल्या क्रॉप टॉपमुळे ट्रोल झाली होती.

उर्फीने आतापर्यंत ‘कसोटी जिंदगी की’, ‘मेरी दुर्गा’, ‘डायन’, ‘बेपनाह’, ‘चंद्र नंदिनी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा