एलन मस्कने ट्विटरसाठी नवीन नियम बनवले आणि ते लागू देखील केले. काही दिवसांपूर्वीच सर्वच प्रसिद्ध व्यक्तींच्या नावापुढची ब्लु टिक काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे दिग्गज लोकं देखील सामान्यच झाले. ही ब्लु टिक पुन्हा मिळवण्यासाठी आता लोकांना पैसे भरावे लागणार आहे. ज्यांनी भरले त्यांना त्यांची ब्लु टिक पुन्हा मिळाली. यात बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश होता. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत देखील त्याच्या ट्विटर अकाउंटचे ब्लु टिक परत मिळाले. ते पाहून ट्विटरचे भारताचे माजी प्रमुख मनीष माहेश्वरीने आपत्ती घेतली. त्यांनी ट्विट करत त्यांची नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.
मनीष माहेश्वरी यांनी ट्विट करत एलन मस्कला थेट प्रश्न विचारला. माहेश्वरी यांनी लिहिले, “आश्चर्य आहे सुशांत सिंग राजपूतने त्याचा फोन नंबर कसा व्हेरीफाईड केला? एक तर तुम्ही खोटे बोलत आहात नाहीतर लोकांनी निधनानंतर देखील पुढच्या जीवनात फोन नेण्याचा मार्ग शोधला आहे.” माहेश्वरी यांच्या या ट्विटनंतर सुशांत सिंग राजपूतचे फॅन्स नाराज झाले आहे. त्यांनी उलट मनीष माहेश्वरी यांनीच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Wondering how @itsSSR verified his phone number @elonmusk? Either you are lying or people have figured out a way to carry their phone in afterlife. pic.twitter.com/QENiHCLjPp
— Manish Maheshwari (@manishm) April 26, 2023
एकाने ट्विट करत मनीष माहेश्वरी यांना ट्रोल करत लिहिले, “सर सुशांत सिंग राजपूतच्या फॅनच्या रूपात मी तुम्हाला विनंती करतो, की सुशांतला या सगळ्यामध्ये अजिबात खेचू नका. तुमची चिंता त्याच्या अकाऊंटच्या ब्लु टिकबद्दल आहे की, फोन नंबर कसा व्हेरीफाईड झाला, त्याबद्दल आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा अनेक लोकांना ही ब्लु टिक मिळाली आहे, जे आता या जगात नाही. मला आशा आहे की, तुम्हाला सर्व माहित आहे की साइन इन करताना सर्व युजर त्यांचा नंबर कसा व्हेरीफाईड करता.”
सुशांत सिंग राजपूत आजही सर्च फॅन्सच्या मनात जिवंत आहे. आज त्याच्या निधनानंतरही ते नेहमीच सुशांतच्या बाजूने उभे राहून त्याला पाठिंबा देतात. त्याला ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांची संख्या १ मिलियन पेक्षा अधिक असून, ट्विटरने त्याला मोफत ब्लु टिक दिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-