Monday, July 1, 2024

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

आपण जर पाहिले तर आजकाल बॉलिवूडमध्ये अतिशय भव्य-दिव्य सिनेमे तयार होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हीएफएक्स वापरून चित्रपट अधिक शानदार केले जातात. चित्रपटाच्या बजेटवरून अनेकदा विविध बातम्या देखील ऐकायला येतात. चित्रपट बनवणे म्हणजे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असते. यामध्ये शूटिंगचा खर्च, कलाकारांच्या फी, चित्रपटांचा पीआर, सेटचा खर्च, व्हीएफएक्स आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्याला वाटत असते, की माझा सिनेमा हा सर्वच दृष्टीने परिपूर्ण असावा. त्यासाठी ते पाण्यासारखा पैसा खर्च करतात. आपल्याकडे एक मानसिकता आहे, सिनेमाचे बजेट जितके जास्त तितकाच सिनेमा देखील चांगला असतो. कधीकधी भव्य दिव्य दिसणाऱ्या चित्रपटांकडे प्रेक्षक जास्त आकर्षित होतात. मात्र याला अनेक अपवाद देखील आहे. त्यासाठी अनेक लोकं बक्कळ पैसा लावून चित्रपटाची निर्मिती करतात. मात्र बऱ्याचवेळा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा हा फासा त्यांच्यावरच उलटा पडला आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत मोठमोठ्या कलाकारांचे बिग बजेट सिनेमे आले, मात्र रसिकांनी त्याच्याकडे सपशेल पाठ फिरवली. आज आपण या लेखातून असेच काही मोठे चित्रपट पाहू, ज्यांचे बजेट भरपूर मोठे होते. मात्र सिनेमा कमाईच्या बाबतीत आपले बजेट देखील काढू शकला आंही आणि फ्लॉप झाला.

बॉम्बे वेल्वेट – १२० करोड :
बॉलिवूडच्या हुशार आणि यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असणाऱ्या अनुराग कश्यपचा हा सिनेमा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा म्हणून ओळखला जातो. अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, करण जोहर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १२० कोटी रुपयांमध्ये तयार झाला होता. मात्र या चित्रपटाने संपूर्ण जगात फक्त ४३ कोटी रुपयांची कमाई केली तर भारतात केवळ २० कोटी रुपये कमावले.

ट्यूबलाइट – १३५ करोड :
या यादीत सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटाचा देखील समावेश आहे. सलमान खानच्या बाबतीत सिनेमा हिट होण्यासाठी ‘बस नाम ही काफी है’ असे म्हटले जाते. पण त्याचा ट्यूबलाइट हा सिनेमा मात्र अपवाद ठरला. अतिशय कमकुवत कथा असणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पचनी नाही पडला. १३५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने ११९ कोटींचा व्यवसाय केला होता. सलमान खानला सर्व डिस्ट्रीब्यूटर्सचे पैसे परत करावे लागले होते.

झिरो – २०० करोड :
शाहरुख खानचा झिरो हा सिनेमादेखील याच भागात मोडतो. तब्बल २०० कोटी खर्च करून हा सिनेमा तयार केला होता. सिनेमाचं ट्रेलर पाहूनच प्रदर्शनाधीच सिनेमा हाऊसफुल्ल झाला. मात्र चित्रपट पहिल्यानंतर सर्वांची मोठी निराशा झाली. हा सिनेमा १०० कोटी देखील कमावू शकला नाही.

रेस-३ -180 करोड :
रेस १ आणि रेस २ या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी रेस ३ सिनेमा बनवला. मात्र हा सिनेमा जोरदार आपटला. १८० कोटी रुपयांचे बजेट असणारा हा चित्रपट १६६ कोटी रुपयेच वसूल करू शकला. सलमान खान ,अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस अशी मोठी स्टारकास्ट देखील या चित्रपटाला वाचवू शकली नाही.

रावण – १३० करोड :
मोठा गाजावाजा करत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. १०० बजेट असणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी कुतूहलाचा विचा होता. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर काही काळातच सर्वांचे कुतूहल निराशेत बदलले आणि सिनेमाला प्रेक्षकांनी पाठ दाखवली. या चित्रपटाने केवळ ११३ कोटी रुपयांची कमाई केली.

 

याव्यतिरिक्त अजून बऱ्याच चित्रपटांचा या यादीत समावेश होईल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

-श्रुती मराठेच्या डॅशिंग लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष; कुणाला आवडला ड्रेस, तर कुणाला तिचा लूक

-गौतमी देशपांडेच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटोने अमृता खानविलकरलाही घातली भुरळ; कमेंट करत म्हणाली…

हे देखील वाचा