Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड स्वरा भास्करला ‘भाऊ’ म्हटल्यामुळे फहाद अहमद झाला ट्रोल, ट्रोलर्स म्हणाले, ‘दोन भावांनी केले लग्न’

स्वरा भास्करला ‘भाऊ’ म्हटल्यामुळे फहाद अहमद झाला ट्रोल, ट्रोलर्स म्हणाले, ‘दोन भावांनी केले लग्न’

बॉलिवूडमधील अभिनेत्री स्वरा भास्करने अचानक लग्न केल्याचे जाहीर केलेले आणि सगळेच हैराण झाले. नेहमीच आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा विवादित वक्तव्यांमुळे गाजणाऱ्या स्वराने लग्न केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील झाला. स्वरा सतत ट्रोलर्सच्या निशाणावरच असते. तिने फक्त पोस्ट करायचा अवकाश असतो की ट्रोलर्स लगेच तिच्यावर निशाणा साधतात. नुकताच स्वराने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचा नवरा आणि राजनेता असलेल्या फहाद अहमदने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. मात्र या पोस्टमुळे फहाद मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे.

स्वरा भास्करचा नवरा असलेल्या फहाद अहमदने त्याची पत्नी असलेल्या स्वरा भास्करसाठी एक पोस्ट शेअर केली. त्याने ट्विटरवर स्वरासोबतचा एक रोमॅंटिक फोटो शेअर करत लिहिले, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भावा. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, तुझे विचार ऐकून मी विवाहित आहे. मला आशा आहे की, तुला ट्विटरवरून समजेल. ” त्याच्या या ट्विटमुळे तो जोरदार ट्रोल होत आहे.

त्याने पुढे लिहिले, “मला प्रत्येक बाबतीत पूर्ण करण्यासाठी धन्यवाद. मी तुझ्यासारखा मित्र आणि गुरु मिळवून स्वतःला धन्य समजत आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या हृदयाचा तुकडा भावा. भाऊ हे नंपुसकलिंगी आहे. ” फहादचे हे ट्विट पाहून ट्रोलर्स जोरदार त्याचा क्लास घेत आहे.

फहादच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने लिहिले, “भाऊ आणि बहीण आता हे जेंडर एकच झाले आहे. आता कोणी कोणाला काहीही बोलू शकतो.अहमदच्या विचाराने आता हा एकच शब्द झाला आहे.” दुसऱ्याने लिहिले, “भावाचा काय अर्थ आहे. कोणत्याही हिशोबाने पत्नीला भाऊ म्हणणे योग्य नाही.” अजून एकाने लिहिले, “दोन भावांनी लग्न केले. वा किती छान.” अजूनही ट्रोलर्स या दोघांचा क्लास घेत असून, त्यावर स्वरा किंवा फहाद दोघांकडून काहीच स्पष्टीकरण आलेले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा