Monday, March 23, 2026
Home अन्य थालापथी विजय होणार चित्रपटांतून निवृत्त; फहाद फासिलच्या पत्नीची भावनिक पोस्ट…

थालापथी विजय होणार चित्रपटांतून निवृत्त; फहाद फासिलच्या पत्नीची भावनिक पोस्ट…

विजय जोसेफ ज्याला त्याचे चाहते थालापथी म्हणतात तो लवकरच अभिनयातून निवृत्त होणार आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली. ‘थालापथी 69’ नंतर हा अभिनेता राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. तमिळ सुपरस्टारच्या या निर्णयानंतर चाहते खूप भावूक झाले आहेत. त्याचबरोबर विजयच्या निवृत्तीवर आतापर्यंत अनेक दिग्गजांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता या यादीत फहाद फाजिलची पत्नी नाझरिया नाझीमचे नावही समाविष्ट झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. X वरील या भावनिक पोस्टमध्ये तिने विजयला एका महापुरुषाच्या युगाचा अंत म्हटले आहे. तसेच, तिने लिहिले की, त्याला शेवटचे पडद्यावर पाहणे हा खूप भावनिक क्षण असेल.

नाझरिया नाझिम हिने लिहिले अलीकडेच थालापथी 69 च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अभिनेत्याबद्दल चाहत्यांच्या भावना टिपल्या आहेत. व्हिडिओमध्ये, विजयच्या चाहत्यांना विश्वास बसत नव्हता की तो आता चित्रपटांचा भाग होणार नाही.

थालापथी 69 चे दिग्दर्शन एच विनोथ करत आहेत. सुपरस्टारचा हा चित्रपट खूप मनोरंजक आणि ॲक्शनने भरलेला असेल असे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओल या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिकासोबत घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

हे देखील वाचा